esakal | ऑनलाईन शिक्षणामध्ये अडचणींचा डोंगर; तब्बल 'इतके' टक्के विद्यार्थ्यांना भेडसावताहेत अनेक समस्या... 
sakal

बोलून बातमी शोधा

online education

कोरोना महामारीमुळे सर्व पालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे शिक्षण पूर्ण करता येईल की नाही, अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. विद्यार्थांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयआयटीचे बी. एन. जगताप आणि शिक्षण संशोधक आंनद मापुसकर यांच्या अध्यक्षतेखाली हे सर्वेक्षण घेण्यात आले.

ऑनलाईन शिक्षणामध्ये अडचणींचा डोंगर; तब्बल 'इतके' टक्के विद्यार्थ्यांना भेडसावताहेत अनेक समस्या... 

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई : राज्यात कोरोनाचा फटका उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बसला आहे. आयआयटी मुंबईच्य टीमने नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून राज्यातील विविध विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या 82 टक्के विद्यार्थ्यांना आर्थिक आणि इतर अडचणींचा सामना करावा लागत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदतीची आवश्यकता असल्याचे सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. आयआयटीकडून गुगल फॉर्मच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले.

लॉकडाऊनदरम्यान मध्य रेल्वेची दमदार कामगिरी; मुंबई विभागाने केली 'इतक्या' लाख वॅगन्सची मालवाहतूक...

कोरोना महामारीमुळे सर्व पालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे शिक्षण पूर्ण करता येईल की नाही, अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. विद्यार्थांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयआयटीचे बी. एन. जगताप आणि शिक्षण संशोधक आंनद मापुसकर यांच्या अध्यक्षतेखाली हे सर्वेक्षण घेण्यात आले. त्यानुसार गुगल फॉर्मच्या मदतीने राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्यात आली.

रुग्णवाहिकांकडून लुटमार सुरुच; अवघ्या अडीच किलोमीटरसाठी आकारले तब्बल 'इतके' हजार रुपये...

सर्वेक्षणात राज्यभरातील 38 हजार 108 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये 19 हजार 495 मुली तर 18 हजार 602 मुलांचा यामध्ये समावेश आहे.  या माध्यमातून कोरोनाचा विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणावर काय परिणाम झाला, हे अभ्यासण्यात आले.
 
...तर वीजग्राहकांना होऊ शकतो 750 रुपयांचा दंड; वाचा सविस्तर...

... तर शिक्षण सोडावे लागणार
उच्च शिक्षण घेणारे बहुतेक विद्यार्थी नोकरी करत शिक्षण घेत आहेत. कोरोनामुळे उद्योगधंदे बंद झाल्याने अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट लवकर संपले नाही तर शिक्षण सोडावे लागणार असल्याची भीती विद्यार्थ्यांनी वर्तवली आहे. 79 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन असून ते ऑनलाईन पद्धतीने आपले शिक्षण घेत आहे. 32 टक्के विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप; तर 6 टक्के विद्यार्थ्यांकडे डेस्कटॉप असल्याचे सर्व्हेक्षणातून कळाले. महाविद्यालये आणि विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले नसल्यामुळे विविध प्रकल्पांवर विद्यार्थ्यांचे सुरू असलेले काम सध्या बंद असून त्यांना प्रयोगशाळांमध्येही संशोधन करता येत नाही.
---
संपादन : ऋषिराज तायडे

loading image