esakal | मराठ्यांना आर्थिक दुर्बलांचे आरक्षण नको, खासदार संभाजीराजे छत्रपतींची सरकारकडे मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

मराठ्यांना आर्थिक दुर्बलांचे आरक्षण नको, खासदार संभाजीराजे छत्रपतींची सरकारकडे मागणी

आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठ्यांना  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे 10 टक्के आरक्षण नको

मराठ्यांना आर्थिक दुर्बलांचे आरक्षण नको, खासदार संभाजीराजे छत्रपतींची सरकारकडे मागणी

sakal_logo
By
संजय मिस्कीन

मुंबई, ता. 29: सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्गासाठीच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठ्यांना  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे 10 टक्के आरक्षण नको. अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी आज सरकारकडे केली. राज्य सरकारने संभाजीराजे यांची मागणी मराठा समाजाची भूमिका असल्याचे मान्य करत याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली. 
आज वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. 

महत्त्वाची बातमी : बॉलिवूडमधील तीन सुपर-डुपर स्टार्स NCB च्या रडारवर, नावांची आद्याक्षरं आहेत एस,आर आणि ए

केंद्र सरकारने देशभरातील आरक्षणाच्या बाहेर असलेल्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर या समाजाला 10 टक्केतील आर्थिक दुर्बलांचे आरक्षण मिळणार असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. मात्र मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे असा आग्रह मराठा समाजाचा असल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. यासाठी 2 ऑक्टोबरपासून राज्यव्यापी धरणे आंदोलन होणार असा इशारा संभाजीराजे यांनी केला. 

महत्त्वाची बातमी : रिया शोविकच्या जामिनाला NCB चा विरोध, न्यायालयाने निकाल राखून ठेवला

10 टक्के EWS आरक्षणाला सकल मराठा समाजाचा विरोध आहे. यातील जाचक अटी आम्हाला मान्य नाहीत असेही संभाजीराजे म्हणाले. दरम्यान आजच्या बैठकीनंतर मराठा समाजासाठी सरकारचे  दरवाजे खुले झाले आहेत असंही संभाजीराजे छत्रपती म्हणालेत. 

maratha society do not want reservation in 10 percent ews category