पालघरमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट...

पालघरमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट...

पालघर - बोईसर औद्योगिक कार्यक्षेत्रातील M3 प्लॉटमध्ये एका फार्मा कंपनीत भीषण स्फोट झालाय. स्फोटाची तीव्रता जास्त असल्याने आसपासच्या पाच किलोमीटर परिसरात या स्फोटाचा हादरा बसलाय. गॅलेक्सी सर्फेक्टंट या कंपनीत हा स्फोट झालाय. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर कंपनी औषधांची असल्याची माहिती समोर येतेय. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच ही कंपनी सुरु होती. 

प्रत्मिक माहितीत सदर कंपनी सॅनिटायझिंग आणि हात धुण्याची लिक्विड बनवण्याची कंपनी असल्याचं समोर आलंय. आणि त्यामुळेच लॉकडाऊनमध्ये देखील ही कंपनी सुरूच होती. घटनेची माहिती मिळताच तारापूर MIDC अग्निशमनदल घटनास्थळी दाखल झालं. या स्फोटाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही मात्र याबाबत आता अधिक तपास  सुरु आहे. 

आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर दोन फॅक्टरी कामगार दगावल्याची माहिती आता समोर येतेय. या स्फोटाची तीव्रता होती की याचा आवाज पाच किलोमीटर दूरवर ऐकू आला. दरम्यान या स्फोटात जखमी व्यक्तींना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. तर स्फोट नेमका कशामुळे झाला  याबाबत आता अधिक तपास सुरु आहे. 

महत्त्वाच्या बातम्या - 

massive blast in palghar three loast their life read full report


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com