
मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकावर आज (४ जून) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. स्थानकात असलेल्या एका केक विक्रीच्या दुकानाला ही आग लागली आहे. घटनेमुळे स्थानकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.