esakal | मुंबईत राहतात 88 भाषा बोलणारी लोकं! तर बंगळूरूत बोलल्या जातात सर्वाधिक 107 भाषा
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai language

मुंबईत राहतात 88 भाषा बोलणारी लोकं! जनगणनेवर आधारित यादी

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई - एका सर्वेक्षणानुसार देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (mumbai) 88 भाषा बोलणारी लोक राहतात..तर बंगळुरूमध्ये 107 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. हो.. हे खरं आहे, देशातील भाषा वैविध्यता यादीत बंगळुरु (bengaluru) प्रथम स्थानावर आहे. 2011 मधील जनगणनेवर आधारित ही यादी असून त्यात लोकसंख्येच्या प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या भाषांचा अभ्यास करून यादी बनवण्यात आली आहे, अशी माहिती तज्ञांनी दिली.

मुंबईत राहतात 88 भाषा बोलणारी लोकं! बंगळुरुत बोलल्या जातात 107 पेक्षा जास्त भाषा

मुंबई पाठोपाठ पुण्यात 93 भाषा बोलल्या जातात. तर बंगळुरु या शर्यतीत पहिल्या स्थानावर असून तेथे 107 भाषा बोलल्या जातात. 2011 च्या जनगणनेवर आधारीत यादीनुसार ही माहिती देण्यात आली आहे. त्यात 22 स्थानिक बोलीभाषांचा समावेश आहे तर 84 इतर भाषा सुध्दा बोलल्या जातात. बंगळुरुनंतर नागालँडमधील दिमापूर जिल्ह्यात 103 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. तर 101 भाषा बोलले जाणारे आसाममधील सोनितपूर या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. यादीनुसार पश्चिम बंगालमधील जलपायगुडीमध्ये 98 भाषा बोलल्या जातात. मेघालयातील पूर्व खासी हिल भागात 96 भाषा बोलल्या जातात. दक्षिण दिल्लीत 97 भाषा बोलल्या जातात. आसाममधील करबी अनलाँगमध्ये 95 भाषा बोलल्या जातात. तर दार्जिलिंगमध्ये 91 भाषा बोलल्या जातात.

हेही वाचा: 'मंदिरं बंद आहेत, मग देव कुठे आहे?, तर देव...'

पद्दुचेरीतील यानाम, बिहारमधील कैमूर, उत्तर प्रदेशमधील कानपूर, तामिळनाडूमधील अरियालपूर या जिल्ह्यांमध्ये 20 पेक्षा कमी भाषा बोलल्या जातात. यावर ब्रुकिंग्ज इन्स्टिट्यूशनचे शमिका रवी आणि भारतीय सांख्यिकी संस्थेतील अर्थशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक मुदित कपूर यांनी विश्लेषण केले आहे.

हेही वाचा: गणेश मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करू द्या; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

loading image
go to top