एमबीए, पीजीडीएम अभ्यासक्रम वेगवेगळ्या संस्थांमध्ये होणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

  • एआयसीटीईचा निर्णय;
  • राज्यातील 32 महाविद्यालयांना फटका 

मुंबई : एमबीए आणि पीजीडीएम अभ्यासक्रम आगामी शैक्षणिक वर्षापासून एकाच संस्थेत शिकवण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) नुकतीच बंदी घातली. या निर्णयाचा फटका राज्यातील 32 हून अधिक महाविद्यालयांना बसणार आहे. 

कर्ज फिटलं साहेब, लेकीच्या लग्नाला या; शेतकऱ्याचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

विद्यार्थ्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या (आयआयएम) धर्तीवर व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मिळावे यासाठी देशातील केंद्रीय, राज्य, अभिमत, खासगी विद्यापीठांमध्ये एमबीए अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत, परंतु अनेक संस्थांनी व्यवस्थापन शिक्षणांतर्गत पदव्युत्तर पदविका म्हणजे पीजीडीएम अभ्यासक्रम सुरू केले. यातील बहुतेक अभ्यासक्रम अर्धवेळ होते. या अभ्यासक्रमांबाबत संबंधित संस्थांनी एआयसीटीईकडे नोंद केलेली नाही. त्यामुळे व्यवस्थापन संस्था म्हणून नोंदणीकृत असलेल्या संस्थेने एकाच वेळी एमबीए आणि पीजीडीएम अभ्यासक्रम चालवू नयेत. पीजीएडीएम अभ्यासक्रमासाठी वेगळी संस्था सुरू करावी लागेल, असा निर्णय एआयसीटीईने घेतला आहे. 

तरुणांसाठी मिनी साहित्य संमेलनाची गरज;डॉ. शशिकांत लोखंडे यांचे प्रतिपादन

एमबीए अभ्यासक्रम शिकवणाऱ्या व्यवस्थापन महाविद्यालयांना पीजीडीएम अभ्यासक्रम राबवायचा असल्यास वेगळी शैक्षणिक संस्था सुरू करावी, असे एआयसीटीईने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या मान्यता प्रक्रिया पुस्तिकेत नमूद केले आहे. या निर्णयामुळे दोन्ही अभ्यासक्रम एकाच ठिकाणी चालवणाऱ्या देशातील 164 शैक्षणिक संस्थांना फटका बसेल. त्यापैकी सर्वाधिक 54 संस्था उत्तर प्रदेशातील; तर 32 संस्था महाराष्ट्रातील आहेत. त्यांच्यात मुंबईतील काही नामांकित संस्थांचाही समोवश आहे. उत्पन्नाचे साधन असलेले हे अभ्यासक्रम बंद झाल्यास या संस्थांचे आर्थिक गणित कोलमडेल, अशी शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MBA, PGDM courses will be conducted in different institutes