Dharavi Rehabilitation Project : धारावी पुनर्वसन प्रकल्प कार्यालयाला म्हाडाची नोटीस

धारावी पुनर्वसन प्रकल्प कार्यालय नरिमन पॉईंटकडे स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरु असतानाच म्हाडाकडून प्रकल्प कार्यालयाला नोटीस पाठविण्यात आली.
MHADA
MHADAsakal

मुंबई - धारावी पुनर्वसन प्रकल्प कार्यालय नरिमन पॉईंटकडे स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरु असतानाच म्हाडाकडून प्रकल्प कार्यालयाला नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळते आहे. दरम्यान म्हाडाकडून तीन नोटीस आल्यामुळे आता प्रकल्प कार्यालयासाठी नवीन जागा शोधण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

दरम्यान, धारावी पुनर्वसन प्रकल्प कार्यालय म्हाडा गृहनिर्माण भवन, वांद्रे कलानगरमध्ये पाचव्या मजल्यावर आहे. मात्र आता प्रशासनाने हे कार्यालय चर्चगेट, नरिमन पॉईंट किंवा मंत्रालय परिसर येथे भाड्याने घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी प्रस्तावदेखील मागविले जात आहेत.

मात्र, आताचे कार्यालय धारावीपासून हाकेच्या अंतरावर असल्याने येथे संपर्क साधण्यास धारावीकरांना सोयीचे आहे. म्हणून हे कार्यालय वांद्र्यातच हवे अशी मागणी धारावीतील नागरिकांनी केली आहे.

याबाबत प्रकल्प कार्यालयातून माहिती घेतली असता प्रकल्प कार्यालयाला म्हाडाकडून तीनवेळा नोटीस देण्यात आली असल्याची माहिती मिळते आहे. सद्यस्थितीत प्रकल्प कार्यालय भाडेतत्वावर असून आगामी काळात कार्यालयाचे विस्तारीकरण करणेदेखील गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com