मुंबई : महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरु केली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येतात. आतापर्यंत लाभार्थी महिलांना योजनेचे एप्रिल महिन्यापर्यंतचे एकूण १० हप्ते देण्यात आले आहेत.