
Maharashtra Minister Pratap Sarnaik Says No Issue If Commissioner Speaks in Hindi During Event
Esakal
मुंबईत मराठी भाषा आमि मराठी अस्मितेचा मुद्दा सातत्याने चर्चेत असतो. हिंदी भाषिकांकडून होणारी अरेरावी आणि मराठीच्या गळचेपीवरून मनसेनं मीरा भाईंदरमध्ये राडा घातला होता. यानंतर आता त्याच ठिकाणी शिवसेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी चक्क आयुक्तांनी तुम्ही हिंदीत बोललात तरी हरकत नाही असं म्हटलंय. महापालिकेच्या निवडणुकच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या मंत्र्यांनी चक्क हिंदी भाषेसाठी पायघड्या घातल्याचा हा प्रकार समोर आलाय.