
शिवसेना एकनाथ शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. शिवसेनेत फुटीनंतर राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले होते. तेव्हा सिडकोचे अध्यक्ष म्हणून घेतलेल्या निर्णयावरून शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शिरसाट यांच्यावर ५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलाय. शिरसाट यांनी सिडकोचे अध्यक्ष असताना पहिल्याच बैठकीत एका कुटुंबाला ५ हजार कोटींची जमीन दिली असा आरोप केला. यावेळी रोहित पवार यांनी त्यासंदर्भात काही कागदपत्रेही पत्रकार परिषदेत दाखवली.