Leopard Enters Building in Mira-Bhayandar
esakal
Leopard in Mira-Bhayandar: नागपूर, कोल्हापूर आणि पुण्यानंतर आता मीरा-भाईंदरमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. तलाव रोड परिसरातील एका इमारतीत हा बिबट्या आढळून आला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून नागरिकांनी आता त्याला एका घरात कोंडून ठेवलं आहे. वनविभागाची टीम या ठिकाणी दाखल झाली असून बिबट्याला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मंत्री प्रताप सरनाईकदेखील या ठिकाणी दाखल झाले आहेत.