मुंबईतील मृतांच्या आकडेवारीबाबत पुन्हा गोंधळ; दोन दिवसांत मृत्यूसंख्येत चक्क दोनशेंचा फरक

समीर सुर्वे
Monday, 10 August 2020

मे महिन्यापर्यंत महापालिका प्रभाग निहाय मृतांची आकडेवारी जाहीर करत नव्हती. कोव्हिड संसर्गावर नियंत्रण येण्यास सुरवात झाल्यानंतर पालिकेने विभागवार मृतांची आकडेवारी जाहीर करण्यास सुरवात केली होती.

मुंबई : मुंबईतील कोरोना नियंत्रणात येत असून नव्याने आढळणारी रुग्णसंख्याही कमी झाली आहे. मात्र, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबतचा गोंधळ अजूनही संपता संपत नाही आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत गोंधळ असल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतरही कोव्हिड मृतांच्या आकडेवारीचा घोळ पुन्हा सुरु झाला आहे. 

चौदा वर्षांपूर्वी लोकलमध्ये त्यांचे पाकिट हरवले; अन् लॉकडाऊनमध्ये पोलिसांचा फोन आला की...

7 ऑगस्ट रोजी घाटकोपर एन प्रभागात 577 मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेने जाहीर केली होती. त्यांनतर 8 ऑगस्ट रोजी 372 मृत्यू झाल्याची माहिती आज जाहीर करण्यात आली आहे. मे महिन्यापर्यंत महापालिका प्रभाग निहाय मृतांची आकडेवारी जाहीर करत नव्हती. कोव्हिड संसर्गावर नियंत्रण येण्यास सुरवात झाल्यानंतर पालिकेने विभागवार मृतांची आकडेवारी जाहीर करण्यास सुरवात केली होती.

लॉकडाऊनमुळे विणकामगार उपाशी; उत्सवच बंद असल्याने दोऱ्या विकणार कुणाला?

6 ऑगस्टपर्यंत घाटकोपर मध्ये 367 मृत्यू असल्याची नोंद होती. त्यानंतर 7 ऑगस्टला तब्बल 577 मृत्यू दाखविण्यात आले. त्यानंतर आज जाहीर केलेल्या 8 ऑगस्टच्या आकडेवारीत 372 मृत्यू दाखविण्यात आले. या घोळाबाबत पालिकेकडून कोणाताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. 

राज्यातील इतर 300 गडकोट-किल्ले संवर्धनाची जबाबदारी कोणाची? वाचा कोणत्या संघटनेने विचारला हा महत्वपुर्ण सवाल

पाच प्रभागात वाढला मृत्यूदर 
पूर्व उपनगरातील मुलूंड टी प्रभागात मृत्यूदर 2.94 टक्क्यांवरुन 3.17 टक्के आहे. भांडूप एस प्रभागात मृत्यूदर 6.21 वरुन 6.28 टक्के झाला. बोरिवली आर मध्यमध्ये 3.25 वरुन 3.40 टक्के, कांदिवली आर दक्षिण 2.86 टक्यांवरुन 3.27 टक्के झाला आहे, तर लालबाग परळ एफ दक्षिण मध्ये 5.72 टक्के इतका मृत्यूदर झाला आहे.

मुंबईकर, जाणून घ्या तुमच्या शहरातील कोरोनाची परिस्थिती

तीन प्रभागात मृत्यूदरात घट
चेंबूर एम पश्चिम प्रभागात मृत्यूदर 7.63 टक्के आहे. एच पूर्व वांद्रे, सांताक्रुझ पूर्व भागात 7.60 टक्के, कुर्ला एल प्रभागात 7.49 टक्के मृत्यूदर आहे. मात्र, या प्रभागात मृत्यूदर कमी झाला असू 23 जूलै रोजी एम पश्चिम 8.30, एच पूर्व 8.26 आणि 7.95 टक्के मृत्यू दर होता.
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: misleading in corona mortality in mumbai, bmc registers wrong numbers