

KDMC Election Twist Shiv Sena UBT Leaders Back After Disappearance
Esakal
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक निकालानंतर ठाकरे गटाचे चार नगरसेवक बेपत्ता होते. यातील एक नगरसेवक मथुर म्हात्रे हे आपल्या घरी परतले आहेत. १६ दिवसांनंतर मधुर म्हात्रे घरी आले आहेत. घरी परतताच कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करीत जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ठाकरे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे अनेक दिवसापासून नॉट रिचेबल आहेत.