Crime News : दुधात पाणी मिसळण्याचा सुरू होता गोरख धंदा! शिवसेना नेत्याने आणला उघडकीस

Crime News
Crime News

डोंबिवली - डोंबिवली जवळील सागावं सागर्ली परिसरात दुधात भेसळ होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तक्रारींचे प्रमाण वाढल्याने शिवसेनेचे कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख महेश पाटील यांनी रविवारी सकाळी टेम्पो नाका परिसरात पाहणी केली असता एका खोलीत हा सगळा गोरख धंदा होत असल्याची बाब उघडकीस आली.

Crime News
Crime News : अल्पवयीन मुलीचा हात पकडून म्हटले, मुझसे बात कर..; चॅटिंगनंतर बोलणे बंद केल्याने...

महेश पाटील, सुजीत नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेसळ करणाऱ्या व्यक्तीला पकडून टिळकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दूधात भेसळ केल्याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी रमेश बनपट्टी (वय 40) याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे.

डोंबिवली ग्रामीण भागातील सागावं सागर्ली परिसरात दुधात भेसळ होत असल्याच्या तक्रारी शिवसेनेचे पाटील यांच्या कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. तक्रारींचे प्रमाण वाढत असल्याने पाटील यांनी परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली होती.

जिमखाना रोडवरील टेम्पो नाका परिसरातील मोहन प्लाझा या इमारतीत हे सुरु असल्याची माहिती त्यांना मिळताच रविवारी पहाटे 5 ला या ठिकाणी जाऊन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहणी केली. त्या ठिकाणी नामांकित कंपनीच्या दुधात भेसळ होत असल्याचा प्रकार उघडकीस आला.

याविषयी पाटील म्हणाले, पहाटे 5 वाजता आम्ही येथे आलो असता एक व्यक्ती या ठिकाणी एका नामांकित कंपनीच्या दुधात भेसळ करत असल्याचे दिसले. त्याला जाब विचारला असता तो घाबरला. तो हैदराबादचा असून मुंबईतील अंधेरी येथून तो अशा प्रकारे भेसळ करण्यास शिकलेला आहे असे त्याने सांगितले.

Crime News
Maharashtra Politics: शिंदे सरकार पडणार? "22 आमदार सोडण्याच्या मनस्थितीत तर 9 खासदारही संपर्कात"

याविषयी आम्ही टिळकनगर पोलिसांना तात्काळ माहिती दिली असून त्यांनी एकाला ताब्यात घेतले आहे. दूध ही जीवनावश्यक वस्तू आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, गरोदर महिला सारेच दूधाचे सेवन करतात. त्यांना जर असे भेसळ युक्त दूध दररोज पिण्यास भेटत असले तर तो त्यांच्या जीवाशी एक प्रकारे खेळ आहे.

दूधात भेसळ करणाऱ्या विरोधात कठोर कायदा आमलात आणला पाहीजे. अन्न व औषध प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून कारवाईचा बडगा उगारला पाहीजे. आम्ही अन्न व औषध प्रशासनाची सकाळ पासून संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत, मात्र कोणीही या ठिकाणी उपलब्ध होऊ शकले नाही याला काय म्हणावे ? असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला.

याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडुरंग पिठे म्हणाले, याप्रकरणी रमेश बनपट्टी याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याठिकाणी पाणी, दूध, ग्लास, प्लास्टिक नरसाळे, कात्री, मेणबत्ती अशा वस्तू आढळून आल्या आहेत.

रमेश याने टेम्पो नाका परिसरातील एका इमारतीत रुम भाड्याने घेतली असून तीन महिन्यांपासून तो या ठिकाणी ही भेसळ करत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. प्राप्त माहितीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. अन्न व औषध प्रशासनास देखील याप्रकरणी संपर्क साधण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com