Anil Parab : "सरकारला शरम वाटली पाहिजे…"; अधिकारी मारहाण प्रकरणात अनिल परबांची रोखठोक भूमिका

Anil Parb
Anil Parbe sakal

मुंबई महापालिकेच्या एच पूर्व कार्यालयातील अधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणात शिवसेना गटाचे आमदार अनिल परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर अनिल परब यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच परब यांनी आम्ही मारहाणीची जबाबदारी नाकारली नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाईची देखील मागणी केली आहे.

अनिल परब म्हणाले की, मोर्चा लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी काढला होता. सरकारला शरम वाटली पाहिजे की बाळासाहेबांचे नाव घेऊन राज्य करतायत त्या बाळासाहेबांचा अपमान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला. बाळासाहेबांचा फोटो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काढू दिला नाही. या अधिकाऱ्यांनी राष्ट्रपुरुषांचा अपमान केला त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल करणार? आम्हाला कितीही गुन्हे दाखल झाले तरी चालतीलं, सामोरे जाऊ असं आव्हान अनिल परब यांनी सरकारला दिलं.

आम्ही पुतळे आणि फोटो काढुद्या असं म्हटल तरी काढू देत नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांना राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिला आहे मग त्यांचा अपमान केला. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही तर आमचं आंदोलन असच सुरूच राहाणार आहे. जे गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना आम्ही सामोरे जाऊ असेही अनिल परब म्हणाले.

Anil Parb
Eknath Khadse : मुख्यमंत्री दौरा अन् एकनाथ खडसे-गुलाबराव पाटलांची हातमिळवणी! न्यायालयातील प्रकरणात झाला अखेर समझोता

मारहाणीची जबाबदारी नकारलेली नाहीये

जी मारहाण झाली त्याची जबाबदारी आम्ही नाकारलेली नाही. हे खुर्चीत बसलेले आहेत. त्यांना खुर्चीची उब लागलेली आहे त्यांना बाळासाहेब आणि महाराज आता आठवत नाहीत. बाळासाहेब यांच्या फोटोवर हातोडा मारला त्याच्यावर काय कारवाई होणार? जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार.

अधिकाऱ्याला झालेली मारहाण म्हणजे उद्रेक होता, ती स्वाभाविक प्रतिक्रिया होती. त्यामुळे कारवाईला सामोरे जाऊ. आमच्या चार कार्यकर्त्यांना अटक झालेली आहे. मला देखील अटक करायची असेल तर सांगा, मी स्वतः पोलीस ठाण्यात हजर होतो. पुढे कोर्टात काय ते बघणार मग ठरवणार असेही अनिल परब म्हणाले.

तसेच आमची शाखा टार्गेट केली त्यांची देखील शाखा अनधिकृत आहे त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी देखील अनिल परब यांनी यावेळी केली.

Anil Parb
Russia News : वॅगनर ग्रुपच्या बंडानंतर पुतिन यांचे राष्ट्राला संबोधन; म्हणाले, हा विजय…

महापालिकेच्या एच पूर्व कार्यालयातील असिस्टंट इंजिनियर पाटील यांना झालेल्या मारहाण प्रकरणात अनिल परब यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी इतर फरार असलेल्या आरोपींचा वाकोला पोलीस शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com