"काँग्रेस, राष्ट्रवादीला सरकारचा 'कंत्राट'नामा दिसत नाही?"

भाजप आमदार अतुल भातखळकर यांची महाविकास आघाडीवर बोचरी टीका
Atul-Bhatkhalkar
Atul-Bhatkhalkar
Summary

भाजप आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: मनोरा आमदार निवासाच्या (Manora MLA Residential Colony) पुनर्बांधणीचा खर्च 2 वर्षाच्या कालावधीत तब्बल 66 टक्क्यांनी वाढला असल्याचा आरोप आमदार अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी हे कंत्राट तात्काळ रद्द करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी. अन्यथा या संपूर्ण प्रकरणाची मुख्य दक्षता आयुक्तांकडे तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पाठवलेल्या पत्रात दिला आहे. सेंट्रल विस्टा (Central Vista) इमारतीच्या बांधकामावरून टीका करणाऱ्या काँग्रेस (Congress), राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांना आपल्या सरकारचा 'कंत्राट'नामा व वायफळ खर्च दिसत नाही काय? असा बोचरा सवाल त्यांनी केला. (MLA Residential Colony Expenses should be Reviewed BJP Demands to CM Uddhav Thackeray)

Atul-Bhatkhalkar
कोरोना काळात मोटरमनच्या माणुसकीने सर्वांनाच जिंकलं

तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीच्या कामाकरिता केंद्र सरकारची संस्था असलेल्या नॅशनल बिल्डींग कन्स्ट्रक्शन कार्पोरेशन सोबत 600 कोटींचा करार केला होता. परंतु महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर तो करार रद्द करण्यात आला. नवीन कंत्राटात केवळ विद्युतीकरणाच्या कामाकरिता तब्बल 250 कोटींचा खर्च दाखविण्यात आला आहे. तसेच या कामाच्या वास्तुविशारदांनी वाढीव 300 कोटी रुपयांचा खर्च हा इमारतीच्या फिनिशिंगवर होणार असल्याचे सांगितले आहे. 600 कोटी रुपयांच्या कामावर 300 कोटी रुपयांची फिनिशिंग केली जाणार असल्याचे सांगणे म्हणजे यात नक्कीच मोठा घोटाळा असल्याची शक्यता भातखळकर यांनी व्यक्त केली आहे.

Atul-Bhatkhalkar
लसीकरण: सरकारी की खासगी? पाहा मुंबईकरांची पसंती कशाला...

सेंट्रल विस्टा इमारतीच्या बांधकामावरून टीका करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या सरकारचा 'कंत्राट'नामा व वायफळ खर्च दिसत नाही काय? महाराष्ट्रात कोरोनावर खर्च करण्यासाठी पैसे नसताना एवढ्या वाढीव दराने काढण्यात आलेले कंत्राट मुख्यमंत्र्यांनी तात्काळ रद्द करावे अन्यथा या विरोधात भारतीय जनता पार्टी मोठे आंदोलन करेल असा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे.

(संपादन- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com