मजूरांच्या अभावी मेट्रो प्रकल्प लांबणीवर; काम पूर्ण करण्यास मात्र प्राधान्य...

संजय घारपुरे
Saturday, 11 July 2020

मजूरांची चणचण असल्याचा अनेक प्रकल्पांच्या कामावर परिणाम झाला आहे. प्रत्येक प्रकल्पांवर मजूरांची खूपच उणीव भासत असल्याचे  प्राधिकरणाने म्हटले आहे.

मुंबई : लॉकडाऊनमुळे मुंबईतील अनेक वाहतूक प्रकल्पांना वेग मिळाला, पण मुंबईतील दोन मेट्रो प्रकल्प यास अपवाद ठरले आहेत. दहिसर-अंधेरी पूर्व आणि दहिसर-डीएन नगर या मार्गावरील मेट्रो या वर्षी डिसेंबरपासून धावणे अपेक्षित होते, पण आता मजूरांअभावी हे काम चार महिने लांबणार अशीच चिन्हे दिसत आहेत. 

मनसेचे पुन्हा खळखट्याक;  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरून संताप...​

मार्चमध्ये लॉकडाऊन सुरु झाल्यावर अनेक ठिकाणी कामे थांबले, पण त्यानंतर कामांना सुरुवात झाली. रस्त्यावरील तसेच लोकलची वाहतूक जवळपास पूर्णपणे थांबल्यामुळे मुंबईतील वाहतूक प्रकल्पांना वेग येईल, अशीच मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची अपेक्षा होती. त्यावेळी काही कामे अंतिम मुदतीपूर्वी पूर्ण होतील अशी अपेक्षा बाळगली जात होती. मात्र आता मजूरांच्या अभावी अनेक प्रकल्पांवर परिणाम झाल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे. 

कल्याणमध्ये कोरोना पसरण्याचा धोका; कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल.... ​

मजूरांची चणचण असल्याचा अनेक प्रकल्पांच्या कामावर परिणाम झाला आहे. प्रत्येक प्रकल्पांवर मजूरांची खूपच उणीव भासत असल्याचे  प्राधिकरणाने म्हटले आहे. अर्थात आता मजूर पुन्हा मुंबई परतण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कामास पुन्हा वेग येण्याची आशा आहे.  अंधेरी पूर्व - दहिसर मार्गावर तेरा स्थानके आहेत. हा 16.475 किलोमीटरचा मार्ग पश्चिम द्रूतगती महामार्ग, पश्चिम रेल्वे, घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोला जोडणार आहे. त्याशिवाय दहिसर ते डीएन नगर तसेच प्रस्तावित स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी या मेट्रो मार्गांना जोडणार आहे. 

कोरोना नियंत्रणासाठी पालिकेचा नवा फॉर्म्युला; उपनगरातील 6 प्रभागात लागू...

मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई जोडणारा हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय विमानतळ, सीप्झ, नॅशनल पार्कसाठी महत्त्वाचा असेल. दहिसर - डीएन नगर हा मेट्रो दोन ए मार्ग 18.589 किमीचा आहे. सतरा स्थानकांच्या या मार्गामुळे पश्चिम द्रूतगती महामार्ग, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेस जोडणारा आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mmrda facing shortage of labours on metro projects amid corona outbreak