कलिना संकुलाचा कायापालट होणार, MMRDA तयार करणार मास्टर प्लान

तेजस वाघमारे
Thursday, 24 September 2020

कलिना संकुलात सुविधा निर्माण करून देण्यासाठी आणि भविष्यातील विकास आराखडा तयार करण्यासाठी एमएमआरडीएने पावले उचलली आहेत

मुंबई, ता. 24 : मुंबई विद्यापीठाचा कलिना परिसराचा बृहत आराखडा म्हणजेच मास्टर प्लान मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (MMRDA ) तयार करण्यात येणार आहे. यासाठी एमएमआरडीएने 3 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. तसेच संकुलात पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी 30 कोटींचीही तरतूद करण्यात आली आहे.

महत्त्वाची बातमी : डबेवाल्यांना चिमटा काढून राज ठाकरे म्हणालेत, मी सरकारशी बोलतो...

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाचा विकास करण्यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून MMRDA ची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार MMRDA कलिना संकुलात विविध सोयी आणि सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील आहे. संकुलात नवीन ग्रंथालय, परीक्षा इमारत, वसतिगृह, परदेशी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, सांस्कृतिक केंद्र आदि सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

महत्त्वाची बातमी : शरद पवारांची संपत्ती आहे तरी किती ? सगळी माहिती आहे या रिपोर्टमध्ये

कलिना संकुलात सुविधा निर्माण करून देण्यासाठी आणि भविष्यातील विकास आराखडा तयार करण्यासाठी एमएमआरडीएने पावले उचलली आहेत. यासाठी कलिना संकुलाचा मास्टर प्लान तयार करण्याचे एमएमआरडीए प्रशासनाने ठरवले आहे. त्यानुसार यंदाच्या अर्थसंकल्पात एमएमआरडीएने तरतूद केली आहे. तसेच पायाभूत सुविधांसाठी 30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कलिना संकुलाचा लवकरच कायापालट होणार आहे.

( संपादन - सुमित बागुल )

mmrda to make master plan for the makeover of kalina complex 30 crore approved in budget


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mmrda to make master plan for the makeover of kalina complex 30 crore approved in budget