मनसे दणका! झटक्यात रुग्णाचे बील सात लाखावरुन तीन लाखावर

शर्मिला वाळूंज
Tuesday, 8 September 2020

डोंबिवलीतील रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरुच असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. येथील एसआरव्ही ममता हॉस्पिटलनेही एका रुग्णाच्या उपचाराठी त्यांना 7 लाख 60 हजार रुपयांचे बिल आकारले. बिलावरील रक्कमेचा आकडा पाहता रुग्णाचे नातेवाईक घाबरले. त्यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांना याविषयी माहिती दिली. 

ठाणे : डोंबिवलीतील रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरुच असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. येथील एसआरव्ही ममता हॉस्पिटलनेही एका रुग्णाच्या उपचाराठी त्यांना 7 लाख 60 हजार रुपयांचे बिल आकारले. बिलावरील रक्कमेचा आकडा पाहता रुग्णाचे नातेवाईक घाबरले. त्यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांना याविषयी माहिती दिली. 

ही बातमी वाचली का? पालघरमध्ये वीज पडून १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पाच जण जखमी

याविषयी रुग्णालय प्रशासनाला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारताच रुग्णालयाने रुग्णाचे बिल 3 लाख 98 हजार केले. रुग्णालयांकडून होणाऱ्या लूटमारी विरोधात नागरिकांनीच आवाज उठवून पुढे यावे, रुग्णालयांची मनमानी मोडून काढण्यासाठी मनसे कायम पुढाकार घेईल असे आवाहन मनसे पदाधिकाऱ्यांनी कल्याण डोंबिवलीकरांना केले आहे. 

ही बातमी वाचली का? कंगना राणावतविरोधात काँग्रेसकडून हक्कभंगाचा प्रस्ताव, गृहमंत्र्यांनी मांडला निषेध ठराव

डोंबिवली निवासी भागातील एसआरव्ही ममता हॉस्पिटलने एका रुग्णास दोन दिवसीय उपचाराचे 7 लाख 60 हजार रुपये बिल आकारले. रुग्णाच्या उपचारासाठी एवढ्या प्रमाणात बिल येणे शक्य नाही. ही लुटमार असल्याचे लक्षात येताच रुग्णाच्या नातेवाईकांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांची भेट घेत त्यांच्याकडे रुग्णालयाविषयी तक्रार केली. त्यानुसार मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, संदेश प्रभुदेसाई, दिपक भोसले यांसह पदाधिकाऱ्यांनी ममता हॉस्पिटल प्रशासनाची भेट घेत त्यांना जाब विचारला. मनसेच्या आक्रमक पावित्र्यानंतर ममता हॉस्पिटल व्यवस्थापनाने 7 लाख 60 हजार रुपयांचे बील 3 लाख 98 रुपये करीत तब्बल 3 लाख 62 हजार रुपये कमी करुन रितसर रुग्णाला उपचाराअंती घरी सोडले.

ही बातमी वाचली का? तांबडी ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; कुटुंबाशी केली दुरचित्रसंवादाद्वारे चर्चा!

कल्याण डोंबिवलीतील रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरुच असून, याविरोधात आता नागरिकांनीच आवाज उठविला पाहीजे. नागरिकांनी आवाज उठविल्यास मनसे त्यांना पूर्णतः सहकार्य करीत ही रुग्णालयांची मनमानी मोडून काढील.
- राजेश कदम, प्रदेश उपाध्यक्ष, मनसे​

--------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS bang in kalyan-dombivali! Patient bills cuts from Rs 7 lakh to Rs 3 lakh