esakal | 'हिंदुहृदयसम्राट' नाही, राज ठाकरेंना मनसैनिकांनी दिली 'ही' उपाधी
sakal

बोलून बातमी शोधा

'हिंदुहृदयसम्राट' नाही, राज ठाकरेंना मनसैनिकांनी दिली 'ही' उपाधी

'हिंदुहृदयसम्राट' नाही, राज ठाकरेंना मनसैनिकांनी दिली 'ही' उपाधी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून २३ जानेवारीला पहिलावहिलं महाअधिवेशन घेण्यात आलं. या अधिवेशनात राज ठाकरे यांनी आपला झेंडा आणि अजेंडा बदलला. या भूमिकेनंतर राज ठाकरे यांना अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडून पाठिंबा मिळालेला पाहायला मिळतोय. राज ठाकरे यांच्या निर्णयाने एकाने तर चक्क राजस्थानात मनसेचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केलाय तर राज ठाकरेंचा नवा झेंडा कन्याकुमारीतदेखील झळकलाय.

मोठी बातमी - मनसेत इनकमिंग... 'या' नेत्यांनी केला 'मनसे'प्रवेश

अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना 'हिंदुहृदयसम्राट' असं देखील संबोधलं गेलं. दरम्यान आपल्याला ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणू नका, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अधिकारी आणि कार्यकर्त्यांना निक्षून सांगितलं. यानंतर आता राज ठाकरे यांना एक नवीन उपाधी देण्यात आली आहे. 

मोठी बातमी -  अरेरे ! गोव्यात खास 'त्या'साठी जाणाऱ्यांसाठी अत्यंत वाईट बातमी..

आजच्या महामोर्चासाठी राज्यभरातून अनेक कार्यकर्ते सामील होतायत. काही संघटना अशाही आहेत  ज्यांनी CAA आणि NRC समर्थनार्थ मोर्चा काढलेला, अशी लोकं यामध्ये सहभागी होणार आहेत. अशाच काही  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडे ‘हिंदूहृदयसम्राटांचा छावा’ असे बॅनर्स आढळले. याचसोबत ‘हिंदू जननायक’ अशा आशयाची पोस्टर्स देखील पाहायला मिळाली आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांनी राज ठाकरे यांना नवीन उपाधी दिल्याचं पाहायला मिळतंय. 

मोठी बातमी -  धावत्या लोकलवर फेकली जातायत कुत्र्याची पिल्लं

महाराष्ट्र मावनिर्माण सेनेच्या मोर्चासाठी प्रचंड उत्साह आज पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईत दाखल होतायत. अशात आज मुंबईतील दादर भागात राम मंदिरात संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात श्रीरामाची आरती देखील केली गेली.  

mns party workers gave new name to party chief raj thackeray see what is new name