मुंबईत मनसे- शिवसेना कामगार संघटना आमने-सामने!

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना आणि भारतीय कामगार सेना यांच्यात वाद झाला आहे.
Mumbai
Mumbaisakal

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील राजकीय वैर पुन्हा एकदा उफाळून आला असून सेना-मनसे या आता पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. एल अँड टी मधील कामगारांच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना आणि भारतीय कामगार सेना यांच्यात वाद झाला आहे.

पवई येथील एल अँड टी कंपनीतील कामगारांच्या समस्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना कंपनीत पोहोचली होती. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक ,विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली आणि रोहन सावंत आपल्या सहकार्यांसमवेत कंपनीत पोहोचले. दरम्यान, कामगारांच्या समस्या मांडून मनसेची कामगार सेना कंपनीतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेच्या कामगारांनी काही मनसे सोबत आलेल्या कामगारांना एकट्यात पाहून अरेरावी करण्यास सुरवात केल्याचा आरोप केतन नाईक यांनी केला. कामगारांना दमदाटी केल्याचे सांगत शिवसेनेच्या कामगार सेने विरोधात मनसे कामगार सेना आक्रमक झाली आहे.

Mumbai
सिंधुदुर्गनगरी : प्रलंबित मागण्यांसाठी कामगार एकवटले

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना कामगारांना घेऊन पवई पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.आत्तापर्यंत कंपनीतील मालकांकडून कामगारांसोबत गैरव्यवहार केला जात होता. पण आता राजकीय पक्षांकडून कामगारांवर असे अत्याचार होत असतील त्याला जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित केला आहे.पोलीस प्रशासनाच्या पाठीमागे लपून कामगारांवर अरेरावी करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यास मनसे कामगार सेना सक्षम आल्याचे मत केतन नाईक यांनी मांडले.

Mumbai
मुंबई : लहान मुलांच्या चाचणीला धीमा प्रतिसाद,

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना आक्रमक झाले आहेत. मनसे आणि शिवसेना आमने सामने येण्याची ही जरी पहिली वेळ नसली तरी कामगारांसाठी ज्या दोन पक्षांतील संघटना काम करत आहेत त्या समोरासमोर आल्यामुळे आता पुढे हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com