मुंबई : लहान मुलांच्या चाचणीला धीमा प्रतिसाद,

10 दिवसांत 17 मुलांची नोंदणी, ट्रायल वेग धरेल डॉक्टरांचा विश्वास
Mumbai
Mumbaisakal

मुंबई : मुलांच्या कोवोवॅक्स लसीच्या चाचणीसाठी पालिकेच्या  नायर रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. या चाचणीसाठी सुरुवातीला पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, गेल्या 10 दिवसांत 17 मुले चाचणीसाठी दाखल झाली आहेत. हे पाहून डॉक्टरांना आशा आहे की लवकरच ट्रायल वेग धरेल आणि क्लिनिकल ट्रायल पूर्ण होईल.

मुंबईत शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरु झाली आहेत, त्यामुळे पालकांना सर्वात मोठी चिंता मुलांच्या सुरक्षिततेची आहे. मुलांचे हित लक्षात घेऊन पालक आता त्यांना चाचणीत सामील करुन घेत आहेत. नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, पालक त्यांच्या मुलांना चाचणीत सहभागी करत आहेत, ही एक चांगली बाब आहे. 2 ते 17 वर्षे वयोगटातील मुले या चाचणीत सहभागी होऊ शकतात. चाचणीसाठी 920 मुलांची नायर रुग्णालयाला आवश्यकता आहे. सद्यस्थितीत 10 दिवसांत 17 मुले चाचणीसाठी योग्य असल्याचे आढळून आले आहे, त्यामुळे डॉक्टर आनंदी आहेत, मात्र तरीही मोठ्या संख्येची गरज आहे.

Mumbai
वानखेडेंच्या अडचणीत वाढ; चौकशीसाठी NCBचं पथक उद्या येणार मुंबईत

नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल म्हणाले की, मुलांनाही कोरोना विषाणूपासून संरक्षणाची गरज असल्याचे पालकांना आता वाटू लागले आहे. शाळा, महाविद्यालयेही सुरू झाली आहेत, अशा परिस्थितीत पालक आता चाचणीत सहभागी होताना दिसत आहेत. येत्या काही दिवसांत ही संख्या आणखी वाढणार आहे.

Mumbai
नवी मुंबईत फटाक्‍यांची ध्वनी तीव्रतेची चाचणी

झायकोव्ह-डीला प्रतिसाद नव्हता -

12 ते 17 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी झायकोव्ह डी नावाच्या लसीची चाचणी ऑगस्टमध्ये मुंबईत सुरू करण्यात आली होती, परंतु या चाचणीला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यात फक्त 12 तरुण मुलांनी सहभाग घेतला.

चाचणीत 'हे' अडथळे -

नायर रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले की, आम्हाला

चाचणीशी संबंधित माहितीसाठी पालकांकडून जवळपास 500 कॉल आले आहेत. यामध्ये 17 मुले रुग्णालयात आली आणि त्यांनी चाचणीत लिहिलेल्या अटींची पूर्तता केली आहे. आता समस्या अशी आहे की नुकत्याच झालेल्या सिरो सर्वेक्षणात 50 टक्के मुलांना कोविड विरूद्ध अँटीबॉडीज तयार झाली आहेत.  या व्यतिरिक्त, बरीचशी मुले इतर रोगांनी ग्रस्त आहेत, त्यामुळे ते देखील सहभागी होऊ शकत नाहीत. या अशा समस्येमुळे आणि अटींमुळे मुलांचा जास्त सहभाग नोंदवता येत नाही.

Mumbai
युवकांना प्रेरित करणारी संस्था हरपली

प्रेरित करण्यासाठी प्रोत्साहन -

मुंबईच्या काही डॉक्टरांच्या मते, मुलांच्या पालकांना प्रोत्साहित करावे लागेल. चाचणीत सहभागी होणाऱ्या मुलांना त्यांच्या निकालात काही अतिरिक्त गुण दिले गेले, तर पालक प्रेरित होऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com