esakal | मुंबईकरांच्या चिंतेत वाढ; परदेशातून तब्बल 14,800  भारतीय देशात दाखल होणार 
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ; परदेशातून तब्बल 14,800  भारतीय देशात दाखल होणार 

कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असतांना, परदेशात अडकलेल्या 14 हजार भारतीयांना परत आणण्याची मोहीम केंद्र सरकारने आखली आहे

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ; परदेशातून तब्बल 14,800  भारतीय देशात दाखल होणार 

sakal_logo
By
विनोद राऊत

मुंबई :  कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असतांना, परदेशात अडकलेल्या 14 हजार भारतीयांना परत आणण्याची मोहीम केंद्र सरकारने आखली आहे. महत्वाचे म्हणजे प्रवासापुर्वी या नागरिकांची कोरोना चाचणी होणार नाही, केवळ साधी वैद्यकीय तपासणी होणार आहे. त्यामुळे आधीच कोरोनाशी झुंजणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या चिंतेत  वाढ होणार आहे.

सर्वात मोठी मोहीम

7 ते 13 मे , अशी सहा दिवस ही मोहीम चालणार आहे. या मोहीमेद्वारे 12 देशात अडकलेल्या 14 हजार 800 लोकांना मायदेशी परत आणले जाणार आहे. यासाठी एयर इंडियाची 64 विमान उड्डाण भरणार आहेत. दिवसाला 2 हजार लोक देशात दाखल होईल.

कोरोना चाचणी होणार नाही
प्रवासापुर्वी या प्रवाशांची साधी वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. ज्या प्रवाशांमध्ये खोकला, सर्दी, तापाची लक्षणे आढळून आली, त्या संबधित प्रवाशांना प्रवासाची परवानगी मिळणार नाही. देशात आणल्यानंतर प्रत्येक प्रवाशाला सक्तीचे 14 दिवस रुग्णालय किंवा इंस्टीट्यूशनल क्वारंटाईनला सामोर जावे लागणार आहे. यातील बहुतांश भारतीय नागरिक आखाती देशातून आणले जाणार आहे. या नागरिकाची तपासणी, विलगीकरण आणि पुढच्या प्रवासाची व्यवस्था करण्याच्या सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत.

बाप रे... घरांच्या किमती एवढ्या घसरणार

राज्य सरकारांच्या चिंतेत वाढ
यापुर्वी आखाती देश आणि अमेरिकेतून आलेल्या भारतीयांमुळे मुंबईत कोरोनाचा फैलाव अधिक झाला होता. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढणार आहे. यातील जास्तीत जास्त प्रवासी आखाती देशातून येणार आहे. त्यानंतर सर्वाधिक कोरोना रुग्णाचे मृत्यु झालेल्या अमेरिका, इंग्लडमधून भारतीय मायदेशी दाखल होणार आहे. चिंतेची बाब म्हणजे या प्रवाशांची केवळ साधी तपासणी होणार आहे. त्यांच्या कोरोना चाचणी होणार नाही. केंद्र सरकारने ही माहिती राज्य सरकारांना कळवली आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

आखाती देशात दहा हजार भारतीयांना कोरोना 
आखाती देशात 10 हजार भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. त्यापैकी 84 लोकांचां मृत्यु झाला आहे. मायदेशात परतणाऱ्या भारतीयांमध्ये सर्वाधिक संख्या आखाती देशातून आहे.

खरंच नियमित पान खाल्ल्याने 'ती'  पावर वाढते का ?

केंद्रीय आऱोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याशी माझी व्हिडीओ कॉन्फरसींग होणार आहे. त्यामध्ये हा मुद्दा मी निश्चित उपस्थित करणार आहे. या प्रवाशांकडून कोरोनाची अधिक बाधा होऊ नये ही राज्य सरकारची  अपेक्षा आहे. - डॉ राजेश टोपे, आरोग्य मंत्री 

प्रवासापुर्वी या प्रवाशांच्या कोरोना चाचण्या केल्या पाहीजे. आम्ही केंद्राकडे हा विषय उपस्थित करणार आहोत. -  पिनयारी विजयन, मुख्यमंत्री केरळ 

64 विमानाद्वारे 14, 800 प्रवाशी मायदेशी येणार त्यामुळे कोणत्या देशात, किती विमाने पाठवली जाणार त्यावर एक नजर टाकुयात... 

 • अमेरिका- 07
 • सिंगापूर-05
 • इंग्लड- 07 

परंपरा खंडित होणार नाही; गणेशोत्सवाबाबत सार्वजनिक समन्वय समितीने मंडळांना केले 'हे' आवाहन
 

आखाती देश

 • सौदी अरेबीया- 05
 • युयेई- 10
 • कतार-02
 • बहरीन-02
 • कुवैत-05
 • ओमान-02

दक्षिण एशिया 

 • बांगलादेश-07
 • मलेशिया-07
 • फिलीपाईन्स-05

काय असणार आहे प्रवास भाडे :

 • लंडन-मुंबई-अहमदाबाद- 50 हजार रुपये 
 • शिकागो- दिल्ली- हैदराबाद- 1 लाख रुपये 
 • ढाका-मुबई- 12 हजार रुपये

या तारखेला मुंबईत दाखल होणार 

 • 7, 8. 9, 10 मे या दिवशी मुंबईत अऩेक प्रवासी दाखल होणार 

more than forteen thousand people to come to mumbai corona threat increased

loading image