Shrikant Shinde: खासदार श्रीकांत शिंदेंच्या भाषणादरम्यान शॉर्टसर्किट; एक जण जखमी

दिव्यातील सभेदरम्यान घडली दुर्घटना
Shrikant Shinde
Shrikant Shinde

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दिवा येथील एका सभेत भाषणादरम्यान वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेत एक जण जखमी झाल्याची देखील माहिती मिळते आहे. यानंतर शिंदे यांनी तात्काळ वीज पुरवठा बंद करण्याच्या सूचना दिल्या. (MP Shrikant Shinde short circuited during his speech One person injured)

Shrikant Shinde
Kolhapur News: तणावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात झाली महत्वाची बैठक! काय झाली चर्चा? केसरकरांनी दिली माहिती

सुत्रांच्या माहितीनुसार, खासदार श्रीकांत शिंदे यांचं भाषण सुरू असताना सभेच्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं. त्यानंतर शिंदे यांनी त्वरित वीज पुरवठा बंद करण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये एक व्यक्ती जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. (Latest Marathi News)

Shrikant Shinde
Churchgate Hostel Murder Case: "मृत विद्यार्थीनीनं अनेकदा केली होती तक्रार, पण..."; पीडितेच्या मैत्रिणी झाल्या व्यक्त

"गेल्या निवडणुकीत आपण ज्या लोकांना मतदान केलं त्याचठिकाणी पाच वर्षांनंतर आता विधानसभेची निवडणूक येईल. या पाच वर्षात आपण दिव्यासाठी काय केलं याच उत्तर देखील आपण मागितलं पाहिजे. फक्त ट्विटर वरून टीका करून काम होत नाही. खाली उतरुन याठिकाणी काम करावं लागतं," अशा शब्दांत खासदार शिंदे यांनी आमदार राजू पाटील यांच नाव न घेता टीका केली. (Marathi Tajya Batmya)

Shrikant Shinde
'औरंगजेबी' प्रवृत्ती डोकं वर काढतील तेव्हा...; राज ठाकरेंनी व्हिडिओ पोस्टमधून दिला इतिहासाचा दाखला

आमचे नगरसेवक पदाधिकारी याठिकाणी काम करत आहेत आणि मला विश्वास आहे की आपला पदाधिकारी हा आपल्या सेवेत तत्पर आहे. आपण दाखवलेल्या विश्वासला कधीही तडा जाणार नाही, असा शब्द मी देतो असंही यावेळी खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com