कोरोनाविरोधी लढ्यात आजी-माजी खासदारही पुढे! विलगीकरण केंद्रे, अन्न-शिधावाटप

कोरोनाविरोधी लढ्यात आजी-माजी खासदारही पुढे! विलगीकरण केंद्रे, अन्न-शिधावाटप


मुंबई : कोरोनाविरोधी लढ्यात जनतेला दिलासा मिळावा यासाठी पूनम महाजन, अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर हे आजी खासदार आणि मिलिंद देवरा हे माजी खासदार वेगवेगळ्या प्रकारे काम करीत आहेत. 

माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा काही उद्योगसमूह आणि विद्यापीठांच्या मदतीने एकूण 900 खाटांची विलगीकरण केंद्रे उभारत आहेत. डोंगरीतील नजम बाग केंद्र महापालिकेकडे हस्तांतरित झाले असून, सेंट झेवियर्स महाविद्यालयातील केंद्र लवकरच सुरू होईल. एमपी मिल कंपाऊंड व मलबार हिल येथेही विलगीकरण केंद्रे उभारली जातील. दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी सुमारे दीड हजार पीपीई किट पुरवले आहेत. पोलिस, महापालिका कर्मचारी व मुख्य रुग्णालयांमधील डॉक्टरांना त्यांनी हे किट दिले आहेत. 

उत्तर-मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनी 90 टक्के मतदारसंघाचे निर्जंतुकीकरण केले असून, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, अपंग, पाळीव आणि भटके प्राणी यांच्यासाठी मदतकार्य केले आहे. त्यांच्यातर्फे रोज सकाळी 18 हजार व सायंकाळी 18 हजार अन्नपाकिटे वाटली जात आहेत. आतापर्यंत 32 हजार कुटुंबांना शिधावाटप करण्यात आले असून, 20 हजार होमिओपथी औषधे, भाज्यांची 14 हजार पाकिटे व फळांची 11 हजार पाकिटे गरजूंना देण्यात आली. इमारतींमधून मागणी आल्यावर थेट शेतमाल पुरवण्याची व्यवस्थाही त्यांनी केली. 

सुरक्षा साधनांची मदत
पूनम महाजन यांनी मतदारसंघातील भाभा, कूपर व व्ही. एन. देसाई रुग्णालये, बँक कर्मचारी, महापालिकेच्या आरोग्यसेविका व आरोग्य अधिकाऱ्यांसाठी 12 हजार फेस शील्ड व 10 हजार पीपीई किटचे वाटप केले. कार्यकर्ते आणि नागरिकांना 60 हजार मास्क, 20 हजार हातमोजे व 10 हजार बाटल्या सॅनिटायझर पुरवण्यात आले. रस्त्यांवर काम करणारे पोलिस व आरोग्य सेविकांना त्यांनी 10 हजार बाटल्या दूध व सरबत वाटण्यात आले. ज्येष्ठ नागरिक व अपंगांना औषधे, किराणा सामान घरपोच देण्याची व्यवस्थाही करण्यात आली. गरजेनुसार रक्तदान शिबिरे भरवणे व पाळीव कुत्र्यांच्या आहारासाठी दुकाने उघडण्याची व्यवस्था करणे आणि भटक्या कुत्र्यांना अन्न देण्यासाठी हेल्पलाईनची व्यवस्थाही त्यांनी केली.

सावंत यांची देशाबाहेरही मदत
दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या मतदारसंघातील पोलिस, डॉक्टर, आरोग्य अधिकारी यांना पीपीई किट, क्रब (ऑपरेशनसाठी पोशाख), फेसशील्ड दिलेच, पण त्यांनी आपल्या मतदारसंघाबाहेर जाऊन मुंबईभर आणि मुंबईबाहेर ठाणे, कल्याण, भिवंडी, मोखाडा, वाडा, कोंढवा, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, वर्धा येथील लोकांनाही शिधावाटपाची व्यवस्था केली. राज्याबाहेरील मेरठ, भोपाळ येथे अडकलेल्या मराठी बांधवांसाठीही त्यांनी तेथील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मदतीने बरीच धडपड केली. तेलंगणात अडकलेल्या दोन मुलींना तसेच कर्नाटकात अडकलेल्या एका नागरिकाला त्यांनी महाराष्ट्रात आणण्याची व्यवस्था केली. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना येथे आणेपर्यंत त्यांच्या निदान जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी त्यांनी परराष्ट्रमंत्र्यांनाच साकडे घातले. मुंबई-पुण्यात अडकलेल्या बिहारी मजुरांसाठी गाडी मंजूर व्हावी यासाठीही त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले.सावंत यांची देशाबाहेरही मदत
....................................
दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या मतदारसंघातील पोलिस, डॉक्टर, आरोग्य अधिकारी यांना पीपीई किट, क्रब (ऑपरेशनसाठी पोशाख), फेसशील्ड दिलेच, पण त्यांनी आपल्या मतदारसंघाबाहेर जाऊन मुंबईभर आणि मुंबईबाहेर ठाणे, कल्याण, भिवंडी, मोखाडा, वाडा, कोंढवा, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, वर्धा येथील लोकांनाही शिधावाटपाची व्यवस्था केली. राज्याबाहेरील मेरठ, भोपाळ येथे अडकलेल्या मराठी बांधवांसाठीही त्यांनी तेथील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मदतीने बरीच धडपड केली. तेलंगणात अडकलेल्या दोन मुलींना तसेच कर्नाटकात अडकलेल्या एका नागरिकाला त्यांनी महाराष्ट्रात आणण्याची व्यवस्था केली. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना येथे आणेपर्यंत त्यांच्या निदान जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी त्यांनी परराष्ट्रमंत्र्यांनाच साकडे घातले. मुंबई-पुण्यात अडकलेल्या बिहारी मजुरांसाठी गाडी मंजूर व्हावी यासाठीही त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com