Thane News : काळू धरणाच्या कामाला गती द्या; मृणाल पेंडसे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन!

Kalu River Project: ठाणे महापालिकेला स्वतःचे धरण नसल्याने घोडबंदर परिसरात दरवर्षी पाणीटंचाई भासते. त्यामुळे काळू नदीवरील धरणाचे काम गतीमान करावे व वाढत्या वाहतूक कोंडीसाठी पर्यायी मार्ग द्यावेत, अशी मागणी माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
CM Fadnavis assures action on Thane’s long-pending Kalu Dam project

CM Fadnavis assures action on Thane’s long-pending Kalu Dam project

sakal

Updated on

ठाणे : मृणाल पेंडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेत लवकरच संबंधित विभागाशी चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. ठाणे शहरात शटडाऊन नंतर निर्माण होणारी पाणीटंचाई आणि घोडबंदर परिसरातील नव्याने उभ्या राहणाऱ्या गृहसंकुलांमुळे तीव्र होत चाललेली पाण्याची समस्या लक्षात घेऊन काळू नदीवरील धरणाचे काम तातडीने मार्गी लागणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

CM Fadnavis assures action on Thane’s long-pending Kalu Dam project
जगात कुठं असं होतं का? प्रकल्प रखडल्यानं फडणवीस कंत्राटदारांवर संतापले, म्हणाले, १५ दिवसात पूर्ण करा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com