
पनवेल : पनवेल शहर आणि परिसरातील वाढत्या प्रवासी संख्येला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने पनवेल एस. टी. आगारात पाच नवीन बसगाड्यांची भर घालण्यात आली आहे. या बसगाड्या आज सकाळी आगारात दाखल झाल्या असून लवकरच त्या विविध मार्गांवर प्रवासी सेवेत दाखल होणार आहेत.