
मुंबई : गणेशोत्सव सण अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. या सणानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. हे पाहता रेल्वेसह एसटी प्रशासनाने जादा गाड्या सोडल्या आहेत. एसटी महामंडळाने घोषित केलेल्या जादा गाड्यांपैकी जवळपास निम्या गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. मात्र कोकणात जाणाऱ्या गाड्या मुंबईत प्रत्येक थांबा घेत नसून थांबा द्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती. दरम्यान एसटी महामंडळाने स्थानकांतील गर्दी टाळण्यासाठी तात्पुरते बस थांबे निश्चित केले आहेत. तसेच बसथांब्यावरून कोकणात जादा गाड्या मार्गस्थ करण्यात येणार आहेत.