

MSRTC bus
sakal
मुंबई : एसटी महामंडळाने ५१५० विजेवरील बस कंत्राटी पद्धतीने भाडे तत्वावर घेण्याचा करार इव्हे ट्रान्स कंपनीशी केला असून सदर कंपनीला गाड्यांचे नवीन वेळापत्रक देऊनही अजूनही अपेक्षित बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या नसून सद्या एसटीला प्रति किलो मीटरला सरासरी अंदाजे २८ ते ३० रुपये इतका तोटा सहन करावा लागत आहे. तोट्याच्या खाईत लोटणारा हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात आला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली आहे.