मालवणीत गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा; अडीच महिन्यांपासून नागरिक त्रस्त

मालवणीत गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा; अडीच महिन्यांपासून नागरिक त्रस्त
मालवणीत गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा; अडीच महिन्यांपासून नागरिक त्रस्त

मालाड : मालवणीतील जुने कलेक्‍टर कंपाऊंड येथे पालिकेच्या जलवाहिनीतून गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. या पाण्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती असून, स्थानिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मालवणी प्रवेशद्वार क्रमांक 5 येथील जुने कलेक्‍टर कंपाऊंड येथील प्लॉट क्रमांक 13, 14, 15 आणि 16 मध्ये गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून पिण्याचे घाण पाणी येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असतानाच दुर्गंधीयुक्त, गढूळ पाण्यामुळे स्थानिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत स्थानिकांनी नगरसेविका कमर जहॉं मोईन सिद्दिकी यांना माहिती दिली असता, त्यांनी पालिकेला लेखी तक्रार करण्यास सांगितले. त्यानंतर याबाबत पालिकेच्या पी उत्तर विभागात लेखी तक्रार केल्यानंतर जल विभागातील अधिकारी दुबे यांनी अनधिकृत जलवाहिन्यांमुळे अधिक घाण पाणी येत असण्याची शक्‍यता व्यक्त केली. तसेच प्रवेशद्वार क्रमांक पाच येथून दुसरी जोडणी दिली जाईल; मात्र त्यासाठी स्थानिकांना खर्च करावा लागेल असे त्यांनी सांगितले. 

गेल्या अडीच महिन्यांपासून पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागत आहे. अनधिकृत जलवाहिन्यांमुळे दुर्गंधीयुक्त, गढूळ पाणीपुरवठा होत असेल तर त्याला जबाबदार कोण? 
- अयान कुरेशी, तक्रारदार रहिवासी 
-----------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com