
मुंबई एका १० वर्षांच्या मुलीवर खेळायला नेण्याच्या बहाण्यानं पुरुषाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय. या प्रकरणी अँटॉपहिल पोलिसांनी पुरुषाला अटक केलीय. अल्पवयीन मुलगी आणि तिच्या भावाला बागेत खेळायला नेण्याचा बहाणा आरोपीने केला. मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिला कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुलीनं आईजवळ घडलेला प्रकार सांगितल्यानं घटना उघडकीस आली. पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.