Milind Narvekar : पवार-शेलारांच्या युतीमध्ये नार्वेकर विजयी; आदित्य ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Milind Narvekar : पवार-शेलारांच्या युतीमध्ये नार्वेकर विजयी; आदित्य ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

Milind Narvekar : पवार-शेलारांच्या युतीमध्ये नार्वेकर विजयी; आदित्य ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

मुंबई : क्रिकेटमधील मिलिंद नार्वेकरांच्या दमदार विजयाबद्दल युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. काल ता .२४ रोजी नार्वेकर यांचे मातोश्रीवर हृद्य अभिनंदन करण्यात आले.त्यानंतर ते लगेचच तिरुपतीला विश्वस्त मंडळाच्या कामासाठी गेले.

हेही वाचा: Mumbai : बेस्टचे कंत्राटी कामगार संपावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना नार्वेकरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यामागचे नेमके कारण काय असा प्रश्न काल केला जात होता.प्रत्यक्षात ते मातोश्रीवर आदित्य ठाकरे यांच्याशी काही महत्वाच्या विषयांवर दुपारी चर्चा करत होते ,तेथूनच ते तिरुपतीला गेले.

हेही वाचा: Mumbai : छठ पूजेसाठी कृत्रिम तलाव तयार करा, शिंदे गटाने मागणी करताच मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमित शहांना नार्वेकरांनी शुभेच्छा देणे हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कारांचा भाग आहे असे काल सांगितले होते.