ST Employee : व्यवस्थापकीय संचालकांच्या आश्वासनानंतर एसटी कर्मचाऱ्याची विरुगिरी थांबली

एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी वाहक सचीदानंद पुरी या कर्मचाऱ्याने बुधवारी डेपो जवळ असलेल्या बीएसएनएल टॉवर वर चढून विरुगीरी केली.
ST Bus
ST Bussakal
Summary

एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी वाहक सचीदानंद पुरी या कर्मचाऱ्याने बुधवारी डेपो जवळ असलेल्या बीएसएनएल टॉवर वर चढून विरुगीरी केली.

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील वाहक सचीदानंद पुरी या कर्मचाऱ्याने बुधवारी डेपो जवळ असलेल्या बीएसएनएल टॉवर वर चढून विरुगीरी केली, सकाळी ८ वाजता टॉवर वर चढल्यानंतर दिवसभरातील चर्चे अंती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी फोनवरून चर्चेसाठी बोलवण्यात आल्याने अखेर पुरी यांनी आपले आंदोलन ५ वाजता मागे घेतले.

संप काळात आझाद मैदानातील संपात सदावर्ते समर्थक म्हणून पुरी यांची ओळख होती. त्यानंतर संपातील घडामोडींचे विश्लेषण करण्यासाठी युट्यूब चॅनल तयार करून संप चालवण्याचे काम सुद्धा पुरी यांनी केले, त्याशिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक घरावरील आंदोलनामध्ये पुरी यांचे नाव घेण्यात आले होते.

त्यानंतर आता पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी पुरी यांनी आंदोलन केले. दरम्यान एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चन्ने यांनी पुरी यांच्याशी फोनवर बोलून चर्चेला निमंत्रण दिल्याने अखेर पुरी यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com