तलासरीत माकपाचा रास्तारोको! मुंबई-अहमदाबाद महामार्ग एक तास रोखून धरला

प्रविण चव्हाण
Thursday, 26 November 2020

अखिल भारतीय किसान सभा व कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तलासरी येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून धरत रास्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्यात आले.

तलासरी : अखिल भारतीय किसान सभा व कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तलासरी येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून धरत रास्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा - SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश, आजपासून प्रवेश प्रक्रिया

केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी कायदे, प्रस्तावित वीज विधेयक विरोधात, वनाधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी अखिल भारतीय किसान सभा, जनवादी महिला, मार्क्सवादी पक्षाकडून शेकडो शेतकरी आणि हजारो कार्यकर्त्यांनी मुंबई अहमदाबाद महामार्ग रोखून धरत जेल भरो आंदोलन केले. 
केंद्र सरकारचे शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे आणि प्रस्तावित वीज विधेयक रद्द करा, प्रत्येक गरजू कुटुंबाला सहा महिने दरमहा 7500 रुपये केंद्र सरकार मार्फत द्या, गरजू कुटुंबाला सहा महिने दहा किलो धान्य केंद्र सरकार मार्फत मोफत द्या, कोरोना रोग इथून सुटका व्हावे म्हणून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सर्वत्र बळकट करा, वनाधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा सर्व दावे मंजूर करून चार हेक्‍टरपर्यंत ची जमीन करणाऱ्यांची नावे करून सातबारा  नावे कब्जेदार सदरी करा, ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसानभरपाई द्या. असा विविध मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात शेकडो शेतकऱ्यांनी महामार्गावर ठाण मांडून केंद्र सरकार व राज्य सरकारचा निषेध करीत घोषणा दिल्या.  

हेही वाचा - शेतकरी आणि कामगार कायद्यांविरोधात जव्हारमध्ये डाव्या पक्षांचे आंदोलन

राष्ट्रीय महामार्ग एक तासासाठी रोखून धरण्यात आला, त्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबून वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी आंदोलनकर्ते व शेतकऱ्यांना अटक करून जेलभरो केल्यानंतर महामार्ग पूर्ववत सुरू करण्यात आला.
यावेळी माकपा आणि किसान सभेचे  बारक्या मांगात, लक्ष्मण डोंबरे, नंदकुमार हाडळ, स्मिता वळवी, राजेश खरपडे,  स्मिता वळवी, सुरेश भोये, रावजी कुर्हाडा, पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रास्ता रोखो आणि जेलभरो आंदोलन करण्यात आला होता.

'Mumbai Ahmedabad highway was blocked for an hour by cpm

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Ahmedabad highway was blocked for an hour by cpm