मुंबई : सक्रिय रुग्णांची चिंता कायम, 19.89% रुग्ण गंभीरवस्थेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

मुंबई : सक्रिय रुग्णांची चिंता कायम, 19.89% रुग्ण गंभीरवस्थेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील कोविड रुग्णांमध्ये दिवसेंदिवस घट नोंदली जात असली तरी सक्रिय रुग्णांची चिंता कायम आहे. कारण, राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 19.89% रुग्ण गंभीरवस्थेत आहेत. सध्या राज्यातील सर्वाधिक 74 टक्के सक्रिय रुग्ण हे पाच जिल्ह्यांमध्ये आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, अहमदनगर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णांचा आलेख वाढता आहे.

1 नोव्हेंबर या दिवशी राज्यात 15,552 सक्रिय रुग्ण होते. हीच संख्या घटून 24 नोव्हेंबरला 9 हजार 366 सक्रिय रुग्ण झाले. राज्यातील सक्रिय रुग्णांपैकी 9,493 रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी 19.89 % रुग्ण गंभीर आहेत. मुंबईसह ठाणे शहरात सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे.

राज्यात 24 नोव्हेंबर पर्यंत 4,855 म्हणजेच 51.2 टक्के हे रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील 1,868 (19.89%)रुग्ण गंभीर आहेत.  एकूण सक्रिय रुग्णांपैकी 9,493 म्हणजेच 4,636 (48.8 टक्के) लक्षण विरहित, सौम्य लक्षणे असणारे आहेत. तर 869 (9.25%) रुग्ण आयसीयू मधून बाहेर आले असून ऑक्सिजन वर आहेत.

हेही वाचा: राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

व्हेंटिलेटरवरील रुग्ण -

9, 493 सक्रिय रुग्णांपैकी 419 म्हणजेच 4.46 टक्के रुग्ण व्हेंटीलेटरवर होते. तर, 450 रुग्ण ऑक्सिजनवर होते. त्याचे प्रमाण 4.79 टक्के एवढे आहे. तर, सध्या आयसीयू बाहेरील पण ऑक्सिजनवर असणारे 999 म्हणजेच 10.64 टक्के एवढे रुग्ण आहेत.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण (74.61 टक्के)

मुंबई 3,568 2,519 26.90

पुणे 2, 882 1,974 21.08

ठाणे 1,293 1,107 11.82

अहमदनगर 1,299 991 10.58

रायगड 319 397 4.24

loading image
go to top