मुंबई : रस्त्यावरील कचरा कुंड्यासाठी बेळगाव पॅटर्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : रस्त्यावरील कचरा कुंड्यासाठी बेळगाव पॅटर्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रस्त्यावरील उघड्या कचरा पेट्यांमुळे संपुर्ण परीसरालाच कचरा पेटीचे स्वरुप येते.यावर आता बेळगाव पॅटर्न पुढे आणला जात आहे.बेळगाव मध्ये भुमिगत कचरा पेट्या बसविण्यात आल्या आहेत त्यामुळे कचरा पेटीबाहेर येतच नाही.

मुंबईत पुर्वी मोठ्या उघड्या कचऱ्या पेट्या ठेवल्या जायच्या.त्या आता बंद झाल्या आहेत.मात्र,आता लहान लहान बंदीस्त प्लास्टीकच्या कचरा पेट्या ठेवल्या जातात.खासकरुन प्रत्येक सोसायटी बाहेर या कचरा पेट्या ठेवल्या जातात.मात्र,या कचरा पेट्या भरल्यानंतर कचरा आजूबाजूला पसरतो.ही समस्या जवळ जवळ संपुर्ण मुंबईतीलच आहे.यावर उपाय म्हणून भाजपच्या स्वप्ना म्हात्रे यांनी बेळगाव पॅटर्न मुंबईत राबविण्याची ठरावाची सुचना महासभेत मांडली आहे.या महिन्याच्या कामाकाजात या ठरावाच्या सुचनेवर चर्चा होणार आहे. महासभेच्या मंजूरीनंतर हा ठराव प्रशासनाच्या मंजूरीसाठी पाठविण्यात येईल.

हेही वाचा: मुंबईत 60 लाख नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण; संपूर्ण लसीकरणाचं आव्हान कायम

मुंबईत सध्या 6500 ते 6800 मेट्रीक टन कचरा रोज जमा होत आहे.त्यातील 100 टक्के कचरा उचलला जातो असा दावा महानगर पालिकेकडून केला जातो.कचरा उचलणाऱ्या वाहानांच्या रोज 1600 हून अधिक फेऱ्या होतात.तर,मुंबईत तब्बल 949 कम्युनिटि कलेक्‍शन पॉईंट आहे.अशी माहिती महानगर पालिकेच्या पर्यावरण स्थीती दर्शक अहवालात नमुद आहे.

उपद्रवी प्राण्याचा त्रास वाढतो

कचरा उघड्यावर पडल्यास त्यामुळे उंदीर घुस अशा उपद्रवी प्राण्याचा त्रास वाढतो.तसेच,भटके श्‍वानांचाही त्रास होतो.उंदरामुळे पदपथही खराब होतात.तर,श्‍वानांचा त्रास पादचाऱ्यांना असतो.

पालिकेचे काय प्रयोग सुरु

डंपिंगवर येणारा ताण कमी करण्यासाठी महानगर पालिकेने रोज 100 किलो पेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या संकुलांना ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

- कचरा जेथे निर्माण होतो त्याच ठिकाणी प्रक्रिया करण्यास प्राधान्य देण्याचा प्रयोग अंधेरी पश्‍चिमेला केला जात आहे.

- महालक्ष्मी येथील कचरा हस्तांतरण केंद्रात कचऱ्या पासून विज निर्मीतीचा प्रयोग करण्यात आला आहे.

हेही वाचा: पुणे : महालक्ष्मी मंदिरात उद्यापासून कार्यक्रम

बेळगाव पॅटर्न काय आहे

बेळगाव येथील रस्त्यांवर एक टन क्षमतेच्या भुमिगत जलदाब पेट्या (हायड्रोलिक डस्टबीन)बसविण्यात आल्या आहेत.बरच्या बाजूला केवळ कचरा टाकण्यासाठी झाकण असते.हे झाकण उघडून कचरा टाकावा लागतो.त्यामुळे कचरा आजूबाजूला पसरत नाही तसेच दुर्घंधीही होत नाही.

उपद्रवी प्राण्याचा त्रास वाढतो

कचरा उघड्यावर पडल्यास त्यामुळे उंदीर घुस अशा उपद्रवी प्राण्याचा त्रास वाढतो.तसेच,भटके श्‍वानांचाही त्रास होतो.उंदरामुळे पदपथही खराब होतात.तर,श्‍वानांचा त्रास पादचाऱ्यांना असतो.

अलर्ट ही येतो

बेळगावातील भुमिगत कचऱ्याच्या पेट्या भरल्यावर त्यावरील सेन्सर मुळे संबंधीत कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर अलर्ट जातो.तसेच हा अलर्ट स्थानिक नगरसेवक आणि स्थानिक वरीष्ठ अधिकाऱ्यांनाही जातो.त्यामुळे तत्काळ कचरा उचलला न गेल्यास संबंधीत जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई होते.असेही म्हात्रे यांनी ठरावाच्या सुचनेत नमुद केले आहे.

loading image
go to top