
मुंबईत सह्याद्री राज्य अतिथीगृहाजवळ बेस्टच्या इलेक्ट्रिक बसनं कारला धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. यात पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला. बेस्टच्या इलेक्ट्रिक बसनं रस्त्यावर उभा असणाऱ्या कारला मागून जोराची धडक दिली. यात बस आणि कारच्या मधे असणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी हादरवणारं दृश्य होतं.