

mumbai cng news
esakal
मुंबई फक्त पावासने तुंबत नाही तर CNG तुटवडा निर्माण झाला तरी मुंबई थबकते असा अनुभव आता अनेक मुंबईकरांना येत आहे. ही भीषण परिस्थिती आहे आणि भविष्यातील मोठं संकट देखील. लोकलची वाहतूक देखील ठप्प झाली आहे. त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मुंबईकरांना सोमवारी सकाळपासूनच सीएनजी संकटाचा मोठा फटका बसला. महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) च्या वडाळा येथील सिटी गेट स्टेशन (सीजीएस) पर्यंत येणारी गेल इंडियाची मुख्य पाइपलाइन एका बांधकामामुळे खराब झाल्याने शहरातील सीएनजी पुरवठा अचानक कोलमडला.