

Mumbai CNG Supply Restored
ESakal
मुंबई : गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या (गेल) वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर झाल्याने महानगर गॅसकडून हाेणारा सीएनजी पुरवठा तिसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी ३ नंतर सुरळीत झाला. त्यामुळे टॅक्सी, शालेय बससह सार्वजनिक वाहतुकीला माेठा दिलासा मिळाला. तत्पूर्वी, दुपारपर्यंत पेट्राेलपंपाबाहेर काही किलाेमीटरपर्यंत रांग लागल्याचे दृश्य कायम हाेते. त्यामुळे सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले. अनेकांनी ‘बेस्ट’सह इतर परिवहन बसचा आसरा घेतल्याने बस स्थानकांत प्रचंड गर्दी झाली होती.