काँग्रेसला आता हवी आघाडी; मुंबईत काँग्रेसचा सूर बदलू लागला

shivsena congress
shivsena congresssakal media

मुंबई : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत (Five state assembly election) फटका बसल्यानंतर आता मुंबईत काँग्रेसचा (congress) सूर बदलू लागला आहे. राज्यात आघाडी असली, तरी मुंबईत विरोधात निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर काँग्रेसचे नेते (congress leader) ठाम होते. मात्र, आता शिवसेनेसोबत (shivsena) आघाडी करूनच निवडणूक (election) लढवायला हवी, अशी गळ विद्यमान नगरसेवकांसह काही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून घातली जात आहे.

shivsena congress
मुंबई विद्यापीठाचे सिनेट अधिवेशन; प्राध्यापक, परिषदेचे सदस्यही करणार विरोध

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक निवडणुकाही सोबत लढण्याची भूमिका शिवसेनेसह, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून मांडली जात आहे; मात्र काँग्रेसची स्थानिक नेतेमंडळी स्वतंत्र लढण्यावर ठाम आहेत. मुंबई पालिकेची निवडणूक स्वतंत्र लढण्याची भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी बोलून दाखवली होती. मात्र, आता पाच राज्यांमध्ये काँग्रेसची दाणादाण झाल्यानंतर मुंबईतील नेतेमंडळींची सूर बदलू लागल आहे. पक्षाच्या केंद्रीय निरीक्षकांपुढे यापूर्वीच आघाडीत निवडणूक लढण्याची भूमिका मांडली गेली आहे. निम्म्याहून अधिक नगरसेवकांची हीच भूमिका आहे, असे पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या मुद्द्यावर मुंबई पालिकेत मत मागू शकत नाही. स्थानिक मुद्द्यावरच प्रचार करावा लागेल. राज्यात सत्तेत असताना मुंबईच्या निवडणुकीत शिवसेनेविरोधात प्रचार केला, तर त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सोबत निवडणूक लढण्याशिवाय पर्याय नाही, असेही काही नगरसेवकांचे मत आहे.

भाजपसह आपचेही आव्हान

काँग्रेससमोर भाजपसह आता आप पक्षाचेही आव्हान आहे. पंजाबमध्ये आपने काँग्रेसला मोठा झटका दिला; तर मुंबई पालिकेसाठीही आपचे कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीत आहेत. काँग्रेसचा आणि भाजप तसेच आपचा मतदारही हा प्रामुख्याने उत्तर भारतीय आहे. त्यामुळे काँग्रेससमोरील स्पर्धा अधिकच वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com