Mumbai Crime : 14 गुन्ह्यातील आरोपीचा हातातील बेडी उघडून पळण्याचा प्रयत्न पोलिसांच्या दक्षतेमुळे फसला

पोलिसांनी कूपर रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी आणलेल्या आरोपीने हातातील बेडी उघडून पळण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याची घटना बुधवारी घडली.
crime
crime esakal
Summary

पोलिसांनी कूपर रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी आणलेल्या आरोपीने हातातील बेडी उघडून पळण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याची घटना बुधवारी घडली.

मुंबई - पोलिसांनी कूपर रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी आणलेल्या आरोपीने हातातील बेडी उघडून पळण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याची घटना बुधवारी घडली. परंतु पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफिने आरोपीला रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पकडले.तौफीक इस्लाम शेख असे 29 वर्षीय आरोपीचे नाव आहे. यावेळी पळून जात असताना अडवले असता आरोपी तौफिकने एका पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण देखील केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलेपार्ले पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात आरोपी तौफीक इस्लाम शेख याला अटक केली होती.

मारहाण करण्यात आलेले पोलीस हवालदार सुयोग वैद्य विलेपार्ले पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. वैद्य व त्यांचे सहकारी पोलीस महाले बुधवारी तौफीकला कूपर रुग्णालयात घेऊन गेले होते. आरोपीची मानसिक स्थिती तपासण्यासाठी एक चाचणी करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याची एमआरआय चाचणी करण्यासाठी सांगितले. त्यामुळे महाले एमआरआय विभागात चौकशी करण्यासाठी गेले. त्यावेळी वैद्य व शेख दोघे कूपर रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावर होते. शेखने हातातील बेडी टोचत असल्याचे सांगून ती थोडी सैल करून घेतली. त्यानंतर त्याने आपल्याला थंडी वाजत असल्याचे सांगून अंगावर चादर देण्यास सांगितले. अंगावर चादर घेतल्यानंतर आरोपीने हळूहळू बेडीतील हात काढून घेतला व अचानक तो वैद्य यांच्या अंगावर धावून आला.

शेखने दिलेल्या धक्क्यामुळे वैद्य खाली कोसळले. त्यानंतर आरोपीने त्यांना मारहाण केली व तेथून पळ काढला. वैद्य यांनी त्याचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. तसेच त्यांनी महाले यांनाही घडलेला प्रकार सांगून रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर थांबण्यास सांगितले. मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्यानंतर शेखने दगड उचलला व मारण्याची धमकी देऊन लागला. अखेर दोन्ही पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला पुन्हा ताब्यात घेतले. याप्रकरणी वैद्य यांच्या तक्रारीवरून जुहू पोलीस ठाण्यात शेखविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. शेख सराईत आरोपी असून त्याच्याविरोधात मारामारी, घरफोडी, जबरी चोरी असे 14 गुन्हे दाखल आहेत. तीन वेळा त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com