सुशांत सिंग राजपुत प्रकरण : NCB कडून बड्या ड्रग्स वितरकाकडून तब्बल 200 किलोचा गांजा जप्त

सुशांत सिंग राजपुत प्रकरण : NCB कडून बड्या ड्रग्स वितरकाकडून तब्बल 200 किलोचा गांजा जप्त

मुंबई : सुशांत सिंग राजपुत प्रकरणी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या(एनसीबी) चौघांची गुरूवारी चौकशी केली. त्यात ड्रग्स सप्लायर करण सजनानी, राहिला फर्निचरवाला, ऋषिकेश पवार व जगताप सिंग यांचा समावेश आहे.

सजनानी आणि फर्निचरवाला दोघेही न्यायालयीन कोठडीत होते. त्यांची पुन्हा चौकशीची परवानगी घेण्यात आली होती. एनसीबीने नुकतीच अटक केलेल्या जगताप सिंगला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

करन सजनानीकडून 200 किलोचा गांजा एनसीबीने जप्त केला. या गांजाला हर्बल प्रोडक्ट दाखवण्यासाठी उत्तर प्रदेशातील रामपूर येथे एक युनीट सुरू करण्यात आले होते. तेथे त्याचे पॅकेजिंग करून हर्बल प्रोडक्ट दाखवण्यात यायचे. त्यामुळे एनसीबीची उत्तर प्रदेशातील पथकही या प्रकरणाचा तपास करत आहे.

सजनानी हा हाँगकाँगमध्ये व्यवसाय करत होता. तेथे नुकसान झाल्यानंतर भारतात परतला, त्यावेळी त्याचा मित्र समीर खान याच्यासोबत 15 महिन्यांपूर्वी त्याचे बोलणे झाले. त्यावेळीच सजनानीने हर्बल प्रोडक्टच्या नावाखाली गांजा विकण्याचे ठरवले होते.

तंबाखू, सीबीडी तेल व गांजा यांचे मिश्रण करून ते हर्बल प्रोडक्ट म्हणून विकण्याचे त्याने ठरवले होते. 

mumbai crime news sushant singh rajput case NCB interrogates four including big illegal herbs dealer

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com