Dharavi Firing: धक्कादायक! धारावीत गोळीबाराची घटना, महिला घरासमोर उभी होती अन् तेवढ्यात...
Mumbai Crime News: धारावीत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यात एक महिला जखमी झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. धारावी परिसरात गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. धारावीच्या मुस्लिम नगर परिसरात सोमवारी रात्री उशिरा घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत एक महिला जखमी झाली आहे.