Mumbai : जलवाहिनी फुटल्याने दुरुस्तीसाठी घाटकोपर, अंधेरी, वांद्रे, खार विभागात पाणीपुरवठा बंद

दुरुस्तीचे कामाला वेळ लागणार
Mumbai
Mumbai esakal

मुंबई : मुंबई मेट्रो प्रकल्पाचे ड्रिलिंगचे काम सुरु असताना गुरुवारी (ता.३०) रात्रीच्या सुमारास अंधेरी (पूर्व), सीप्झ गेट क्रमांक ३ आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ मुख्य जलवाहिनीला मोठे भगदाड पडून लाखो लिटर पाणी वाया गेले. पालिका जलअभियंता खात्याच्या गळती दुरुस्ती पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.

Mumbai
Weight Loss Tips : गरम पाणी पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते का?

मात्र, दुरुस्तीचे कामाला वेळ लागणार असल्याने घाटकोपर (प.), जोगेश्वरी, विलेपार्ले, राममंदिर, गोरेगाव, चकाला, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी (प.),बिंबिसार नगर आदी विभागत संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर मरोळ गाव, शिप्झ, आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर आदी विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.नागरिकांनी अगोदरच आवश्यक पाणीसाठा करून त्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिका जलअभियंता खात्याने केले आहे.

Mumbai
Thyroid Control Tips : थायरॉईडला कंट्रोल करण्यासाठी ‘या’ सोप्या आयुर्वेदिक टीप्सची घ्या मदत

ड्रीलिंगचे काम सुरू असताना मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या वेरावली ३ जलाशयाच्या १८०० मी. मी. व्यासाच्या दोन इनलेट पैकी एक इनलेट भूमिगत मुख्य जलवाहिनीला नुकसान झाले असून जलअभियंता खात्याच्या अधिकारी, अभियंते, कर्मचारी टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. मात्र दुरुस्तीच्या कामाला बराच कालावधी लागणार असल्याचे जलाभियंता विभागाने कळविले आहे.

Mumbai
Share Market Tips: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये ?

वेरावली जलवाहिनी दुरुस्तीचे काम उध्या शनिवारी सकाळी ८.३० वाजेपासून परवा रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे काही विभागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद तर काही विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

या भागात पाणी पूरवठा खंडित

घाटकोपर अशोकनगर, संजयनगर, सांतानगर, साने गुरुजी नगर, हिमालय सोसायटी, मिलिंद नगर, आंबेडकर नगर, सुंदर नगर, असल्फा, यादव नगर, साकीनाका पोस्ट ऑफिस, दुर्गामाता मंदीर मार्ग, जंगलेश्वर महादेव मंदीर मार्ग, लोयलका, भानुशाली वाडी, कुलकर्णी वाडी, चर्च गल्ली संघर्ष नगर - (नियमित पाणीपुरवठा वेळ- सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत) (दिनांक ०२.१२.२०२३ रोजी सकाळी ८:३० वाजेपासून ते दिनांक ०३.१२.२०२३ सकाळी ८:३० वाजेपर्यंत पाणी पुरवठा खंडित राहील.

Mumbai
Hair Care Tips : कोरड्या आणि फ्रिझी केसांना मऊ बनवायचे आहे? मग, ‘या’ टीप्सची घ्या मदत

एन एस एस मार्ग, साने गुरूजी नगर, आणि पंपींग, होम गार्ड, हिल नंबर २, हिमाल्या सोसायटी, मिलिंद नगर, वाल्मिकी नगर, संतोषीमाता नगर, द्स्सर कंपाउंड, संजय नगर, बाबा चौक, रठोड मेडीकल, अशोक नगर - (नियमित पाणीपुरवठा वेळ- दुपारी २.३० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत) (दिनांक ०२.१२.२०२३ रोजी सकाळी ८:३० वाजेपासून ते दिनांक ०३.१२.२०२३ सकाळी ८:३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहील), रामनगर, हनुमान नगर, राहुल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, शंकर मंदीर, जयमल्हार नगर, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकरी सोसायटी, वर्षा नगर, ए व बी कॉलनीचा काही परिसर, डी व सी म्युनिसिपल कॉलनी, रायगड विभाग, आनंदगड, यशवंत नगर, गावदेवी, पठाण चाळ, अमृतनगर, इंदिरा नगर १ व २, अमिनाबाई चाळ, गणेश मैदान, मौलानाकंपाऊंड, हरिपाडा, जगदुषानगर, कठोडीपाडा, भीमानगर, अल्ताफ नगर, गेल्डानगर, गोळीबार रोड, नवीन दयासागर, जवाहरभाई प्लॉट, सेवानगर, ओ.एन.जी.सी. कॉलनी, माजगावडॉक कॉलनी, गंगावाडीगेटनं. २, सिद्धार्थनगर, आंबेडकरनगर, साईनाथनगर, पाटीदारवाडी, रामाजीनगर, भटवाडी, रामाजीनगर, भटवाडी, बर्वेनगर, काजूटेकडी, अकबरलालाकंपाऊंड, आझादनगर, पारसीवाडी, सोनियागांधीनगर, खाडीमशीन, गंगावाडीचाकाहीपरिसर. (नियमित पाणीपुरवठा वेळ- २४ तास) (दिनांक ०२.१२.२०२३ रोजी सकाळी ८:३० वाजेपासून ते दिनांक ०३.१२.२०२३ सकाळी ८:३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहील)

Mumbai
Parenting Tips : मुलांचा आत्मविश्वास कमी झाला आहे? मग, ‘या’ टीप्सची घ्या मदत

अंधेरी पूर्व - बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानीपाडा, सुभाषरोड, चाचानगर (नियमित पाणीपुरवठा वेळ- दुपारी १२.४५ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत) (दिनांक ०२.१२.२०२३ रोजी पाणीपुरवठा खंडित राहील)

वेरावली १ - बांद्राप्लॉट, हरीनगर, शिवाजीनगर,पास्कलकॉलोनी, शंकरवाडी- (नियमित पाणीपुरवठा वेळ- दुपारी १.३० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत) (दिनांक ०२.१२.२०२३ रोजी पाणीपुरवठा खंडित राहील)

Mumbai
Eye Care Tips : डोळ्यांचा चष्मा कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टीप्स

पंप हाउस, विजय राउत मार्ग, पाटील वाडी, हंजर नगर, झगडा पाडा, पारसी कॉलनी, जिजामाता मार्ग, गुंदवली हिल,आशीर्वाद चाळ, गुंदवली आझाद मार्ग, सर्वोदय नगर - (नियमित पाणीपुरवठा वेळ- सायंकाळी ५.०० ते रात्री ९.३० वाजेपर्यंत) (दिनांक ०२.१२.२०२३ रोजी पाणीपुरवठा खंडित राहील)

विशाल हॉल, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकर वाडी, बिमा नगर, पंथकी बाग, तेली गल्ली, हाजीजुमान चाळ, कोळडोंगरी, जीवा महाले मार्ग, साईवाडी, जीवन विकास केंद्र, शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान नगर, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्री नगर, आंबेडकर नगर, काजुवाडी, चकाला गावठान, डोमेस्टीक एअरपोर्ट, विलेपार्लेचा बहुतांश भाग- (नियमित पाणीपुरवठा वेळ- सायंकाळी ५.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत) (दिनांक ०२.१२.२०२३ रोजी पाणीपुरवठा खंडित राहील)

Mumbai
Winter Makeup Tips : हिवाळ्यात नैसर्गिक आणि नॉन ऑयली मेकअप लूक हवाय? मग, 'या' टीप्स करा फॉलो

गोरेगाव- बिंबीसारनगर- (नियमित पाणीपुरवठा वेळ- सायंकाळी ६.०० ते रात्री ९.३० वाजेपर्यंत) (दिनांक ०२.१२.२०२३ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल)

राम मंदीर, गोरेगाव पश्चिम (नियमित पाणीपुरवठा वेळ- सायंकाळी ७.३० ते रात्री ९.३० वाजेपर्यंत) (दिनांक ०२.१२.२०२३ रोजी पाणीपुरवठा खंडीत राहील)

अंधेरी पूर्व - मोगरपाडा, न्यू नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग मार्ग, निकोलस वाडी परिसर अंबावाडी, गुंदवली परिसर- (नियमित पाणीपुरवठा वेळ- रात्री ८.०० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत) (दिनांक ०२.१२.२०२३ रोजी पाणीपुरवठा खंडीत राहील)

Mumbai
Mental Health Tips : दिवसभरातील ताण-तणावानंतर स्वत:ला असे करा रिचार्ज, करा 'या' अ‍ॅक्टिव्हिटी

जोगेश्वरी – शिव टेकडी, दत्त टेकडी, मजासगाव टेकडी, आनंद नगर, समर्थ नगर, स्मशान टेकडी, अग्रवाल नगर, श्याम नगर, मेघवाडी, नटवर नगर, रोहिदास नगर, गांधी नगर, सरस्वती बाग, जोगेश्वरी स्थानक रोड, नवलकर वाडी, एच. एफ. सोसायटी मार्ग, साईवाडी, मोगरापाडा, इंदीरा नगर- (नियमित पाणीपुरवठा वेळ- दुपारी ३.५० ते सकाळी ६.२५ वाजेपर्यंत) (दिनांक ०३.१२.२०२३ रोजी पाणीपुरवठा खंडीत राहील) महाकाली मार्ग, पेपर बॉक्स, मालपा डोंगरी नंबर ३, शेर –ए-पंजाब, बिंद्रा कॉम्प्लेक्स, हंजर नगर, गणेश नगर, शोभना परिसर, पूनम नगर, गोनी नगर, पी. एम. जी. पी. कॉलनी, कोकण नगर, संजय नगर (नियमित पाणीपुरवठा वेळ – पहाटे ४.३० ते सकाळी ७.५० वाजेपर्यंत) (दिनांक ०३.१२. २०२३ रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ७.५० दरम्यान पाणीपुरवठा खंडित राहील.)

Mumbai
Parenting Tips: मुलांच्या रागावर असं मिळवा नियंत्रण, या आहेत सर्वात सोप्या टिप्स

खार - टीपीएस पाच, आगरी पाडा, सेवा नगर, हनुमान टेकडी, ७ वा रस्ता, खार सबवे, डवरी नगर, शिवाजी नगर, गावदेवी, वाकोला पाईपलाईन मार्ग, नेहरू मार्ग (नियमित पाणीपुरवठा वेळ – पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० वाजेपर्यंत) (दिनांक ०३.१२. २०२३ रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० दरम्यान पाणीपुरवठा खंडित राहील.)

सांताक्रूझ- सांताक्रुझ पश्चिम विभाग, गजारबंध, खार पश्चिमेचा पश्चिम रेल्वे परिसर आणि डॉ. आंबेडकर मार्ग मधील काही परिसर (नियमित पाणीपुरवठा वेळ – पहाटे ४.०० ते सकाळी ९.०० वाजेपर्यंत) (दि.०२.१२.२०२३ रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ८.३० व दिनांक ०३.१२.२०२३ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.)

Mumbai
Winter Tips : हिवाळ्यात 'अशी' घ्या नवजात बाळाची काळजी; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात गंभीर परिणाम

वांद्रे पश्चिम- (नियमित पाणीपुरवठा वेळ - पहाटे ४.३० ते सकाळी ९.०० वाजेपर्यंत) (दिनांक ०२.१२.२०२३ रोजी सकाळी ०४.३० ते सकाळी ०८.३० व दि.०३.१२.२०२३ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.)

अंधेरी पश्चिम - (नियमित पाणीपुरवठा वेळ - दि.०२.१२.२०२३ रोजी सकाळी ०८.३० वाजेपासून ते दि. ०३.१२.२०२३ सकाळी ०८.३० वाजेपर्यंत) (पाणीपुरवठा खंडित राहील.)

Mumbai
Hair Care Tips : केसातला कोंडा कायमचाच घालवेल मुगाची डाळ? कशी वापरायची ते पहा

भांडुप – गौतमनगर निम्नपातळी, जयभीम नगर, बेस्ट नगर, फिल्टरपाडा, गावदेवी, पठाणवाडी, महात्मा फुले नगर, मुरारजी नगर, आरे रोड, पवई (नियमित पाणीपुरवठा वेळ - दि.०२.१२.२०२३ रोजी सकाळी ०८.३० वाजेपासून ते दि. ०३.१२.२०२३ सकाळी ०८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहील)

चकला - प्रकाशवाडी, गोविंदवाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व २, शिवाजी नगर. ए. के. मार्ग, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, मरोळ मरोशी मार्ग, टाकपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, जे. बी. नगर, बगरखा रोड, कांतीनगर, कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी कॉलनी (निमित पाणीपुरवठा वेळ दुपारी २.०० ते सायंकाळी ५.३०) (दि.०२.१२.२०२३ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने / खंडीत राहील).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com