Mumbai Crime : जडी बुटीच्या नावाखाली अगरबत्तीचा चुरा आणि तेल; भोंदूबाबाचा पाच लाखाला गंडा

घरात काही त्रास, व्याधी असल्यास ती दूर करतो असे सांगत जडी बुटीच्या नावाखाली तो अगरबत्तीचा चुरा आणि तेल मिक्स करुन ग्राहकांना देत असे.
Mohammad Aasif Hingora
Mohammad Aasif Hingorasakal
Summary

घरात काही त्रास, व्याधी असल्यास ती दूर करतो असे सांगत जडी बुटीच्या नावाखाली तो अगरबत्तीचा चुरा आणि तेल मिक्स करुन ग्राहकांना देत असे.

डोंबिवली - घरात काही त्रास, व्याधी असल्यास ती दूर करतो असे सांगत जडी बुटीच्या नावाखाली तो अगरबत्तीचा चुरा आणि तेल मिक्स करुन ग्राहकांना देत असे. पोलिसांच्या ताब्यात सापडू नये यासाठी संजय गांधी उद्यानात तो डेरा टाकून बसला होता. तीनहात नाका येथे तो येणार असल्याची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक नवनाथ रुपवते यांच्या पथकाने सापळा रचून त्याला ठाण्यातून अटक केली. मोहम्मद आसीफ मोहम्मद आरीफ हिंगोरा (वय 37) असे अटक आरोपीचे नाव असून सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

ठाण्यातील घोडबंदर येथील गायमुख परिसरात मोहम्मद हिंगोरा हा पत्नीसह रहातो. मुळचा वर्ध्याचा असणारा मोहम्मद हा कोणाला घरात काही त्रास असेल, कोणाला काही व्याधी असेल त्या दूर करण्यासाठी जडी बुटी देत असे. त्यासाठी अगरबत्तीचा चुरा आणि तेलाचा वापर करत असे. कल्याण पश्चिमेला कोळीवाडा येथे राहणाऱ्या आरिफा मुलानी (वय 29) याचा दिर हा गतीमंद असून त्याच्यावर उपचार करुन त्यास पूर्णपणे बरा करतो असे सांगत मोहम्मद याने जादुटोणा व मंत्र सिद्धी चा बहाणा केला.

केवळ अगरबत्ती धूर करुन मंत्र सिद्धी करत असल्याचे भासवत असे व तेल लावून उपचार करत असे. त्यासाठी मोहम्मदने आरीफाकडून रोख व ऑनलाईन स्वरुपात 3 लाख 6 हजार रुपये उकळले. तसेच साक्षीदार अंजुम शेख यांच्याकडून 2 लाख 33 हजार रुपये घेतले. जानेवारी 2022 ते 14 सप्टेंबर पर्यंत उपचार करुन देखील कोणताही फरक न पडल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आरीफा यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेत मोहम्मद याच्या विरोधात तक्रार दाखल केली. अशाच पद्धतीने फसवणूक झाल्यााची तक्रार एप्रिल महिन्यात बाजारपेठ पोलिसांकडे आली होती. तेव्हापासून पोलीस या भोंदूबाबाचा शोध घेत होते.

गेल्या सात आठ महिन्यांपासून ते त्याच्या मागावर होते. गायमुख, मिरारोड परिसरात तो सातत्याने आपली ठिकाण बदलत पोलिसांना गुंगारा देत होता. तसेच जास्तीत जास्त काळ तो संजय गांधी उद्यानातील जंगलात लपून बसत असे. जंगलात लपून बसत असल्यामुळे तो पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता.

बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपवते यांनी जलद गतीने तपास सुरु केला. गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार तो ठाण्यातील तीन हात नाका येथे येणार असल्याची माहिती रुपवते यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ठाण्यातून मोहम्मद याला अटक करण्यात आली. बुधवारी मोहम्मद याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक रुपवते यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com