
Massive Fire in Mumbai Chawl Claims Teen’s Life, Leaves Three Injured
Esakal
Massive Fire in Mumbai Chawl: मुंबईत एका चाळीत सोमवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत एका १५ वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या आगीत तिघे जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी पहाटे कफ परेड परिसरात असलेल्या एका चाळीत ही आगीची दुर्घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग एक तासात आटोक्यात आणण्यात यश आलं.