मुंबई : लसीकरणात अव्वल असून ही पहिला डोस पूर्ण करण्यास राज्याची पीछेहाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

मुंबई : लसीकरणात अव्वल असून ही पहिला डोस पूर्ण करण्यास राज्याची पीछेहाट

मुंबई : महाराष्ट्र राज्यात देशाच्या तुलनेत अव्वल लसीकरण झाले आहे. मात्र, लसीकरणात अव्वल असून ही पहिला डोस पूर्ण करण्यात राज्याची पीछेहाट झाली आहे.  त्यामुळे, लसीकरण उद्दिष्ट गाठण्यास आणखी किमान  15 दिवस वाढवण्याची शक्यता आहे.

30 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्व 9 कोटी पात्र लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट राज्याने ठेवले आहे. मात्र, ही डेडलाइन हुकणार असल्याचे चित्र सध्या समोर येत आहे.

कोविन डॅशबोर्ड म्हणजेच भारतातील सर्व लसीकरण माहितीचा केंद्रीय डेटाबेसनुसार महाराष्ट्राने 23 नोव्हेंबरपर्यंत 7 कोटींहून अधिक नागरिकांना पहिला डोस दिला आहे. म्हणजेच 21.51% नागरिकांचे लसीकरण झाले आहे.   तर, साडे तीन कोटींहून अधिक नागरिकांचा दुसरा डोस झाला आहे. मात्र, 30 नोव्हेंबरपर्यंत लक्ष्य गाठण्याची राज्याची तयारी असल्याचे राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले.

हेही वाचा: डोंबिवली : शेअर रिक्षात प्रवासी चार,भाडे मात्र दुप्पट दरानेच

2 नोव्हेंबर रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत लसीकरण आढावा बैठकीत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला 30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के पहिला डोस करण्याचे आदेश दिले होते. पण, राज्यातील अधिकाऱ्यांना ही डेडलाइन पाळणे कठीण जाईल असे दिसून येत आहे. 

राज्यातील एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार,  त्यांना आता 15 डिसेंबर पर्यंत पहिला डोस पूर्ण करणे शक्य होणार आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्याला पुढील सात दिवसांत दररोज 10 ते 15 लाख नागरिकांना डोस द्यावे लागतील पण, हे शक्य होणार नाही. 

हेही वाचा: अम्रीता विश्व विद्यापीठ, सकाळ, यीन प्रस्तुत विल रोबोट रुल Manufacturing इंडस्ट्री विषयवार वेबीनार

गेल्या 32 दिवसांत, (22 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर) राज्यात दिवसाला सरासरी 428,467 डोस दिले गेले. राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई म्हणाले की, महिन्याच्या सुरुवातीला दिवाळीच्या सणामुळे लसीकरणात घट झाली होती, परंतु गेल्या काही दिवसांत त्यात वेग आला आहे. 23 नोव्हेंबर रोजी कोविन डॅशबोर्डनुसार, राज्याने 7 कोटींहून अधिक डोस दिले. दररोज सरासरी 8 ते 10 लाख नागरिकांचा लसीकरण केले जात आहे. आम्ही 30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के पहिला डोस करण्याच्या प्रयत्नात आहोत. पहिला डोस 80 टक्के झाला आहे. राज्यात 18 वर्षांवरील 9.14  कोटी एवढे पात्र लाभार्थी आहेत.  पूर्वी आपण 4 लाखांपर्यंत लसीकरण करत आहोत आता 8 लाखांपेक्षा जास्त लसीकरण केले जात आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 4 नोव्हेंबरपर्यंत, रोजच्या पहिल्या डोसची संख्या दुसऱ्या डोसपेक्षा जास्त होती. तेव्हापासून, दुसऱ्या डोसची संख्या पहिल्या डोसपेक्षा जास्त झाली आहे. " हे फरक प्रामुख्याने कोविशील्ड लसीच्या डोसमधील दीर्घ अंतरामुळे (84 दिवस) आहे, ज्यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये डोस घेतले त्यांचा दुसरा डोस या कालावधीत आहे. 

हेही वाचा: महाराष्ट्राचे 'मिनी कास पठार' पर्यटकांसाठी सप्टेंबरमध्ये सुरु होणार?

याशिवाय, काही समुदायांमध्ये काही प्रमाणात लसीबाबत संकोच आहे. यासाठी पुढाकार घेत कार्यक्रम राबवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनांना देण्यात आले आहेत,” असेही त्यांनी सांगितले.

राज्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पालघर, नंदुरबार, गडचिरोली आणि अमरावती या आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची संख्या कमी आहे. राज्य लसीकरण अधिकारी डॉ. देसाई म्हणाले की, लसीबाबत संकोच आणि दैनंदिन रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे नागरिक पूर्वीसारखे चिंतित नाहीत. आमच्याकडे लसी आणि सिरिंजचा पुरेसा साठा आहे. नोव्हेंबरच्या शेवटी नाही तर पुढच्या महिन्यापर्यंत 100% पहिला डोसचे उद्दिष्ट गाठू. ”

आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,  16 जानेवारीपासून सुरू झालेली लसीकरण मोहीम अनेक जिल्ह्यांमध्ये मागे पडली आहे. राज्यातील 36 पैकी बावीस जिल्ह्यांमध्ये पहिल्या डोसचे प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. अकोला, नंदुरबार, बीड आणि अमरावतीत पहिल्या डोससह केवळ 55% पात्र लोकसंख्येने लसीकरण केले आहे.

loading image
go to top