मुंबई : आरेत पुन्हा बिबट्याचा हल्ला

१४ वर्षीय मुलगा जखमी; महिनाभरातील सहावी घटना
Mumbai
MumbaiSakal

मुंबई : आरे (Aarey) परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून स्थानिकांवरील हल्ल्यांमध्येही वाढ होत आहे. शुक्रवारीदेखील बिबट्याने एका १४ वर्षीय मुलावर हल्ला करून त्याला जखमी केले. मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे; मात्र बिबट्याने हल्ला करण्याची महिनाभरातील ही सहावी घटना असून यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

झालेल्या हल्ल्यात दर्शन सतीश (वय १४) जखमी झाला आहे. तो प्रसूती कॉलेजजवळील युनिट १३ येथे राहतो. शुक्रवारी रात्री मित्रांसोबत तो जंगलातील रस्त्याने जात होता. मित्र काहीसे पुढे गेल्यानंतर एकट्या पडलेल्या दर्शनवर बिबट्याने हल्ला केला. दर्शनने आरडाओरड सुरू केल्यानंतर तातडीने मित्र धावून आले व सर्वांनी मिळून बिबट्याला पळवून लावले; मात्र हल्ल्यात दर्शनला गंभीर जखमा झाल्या. गेल्या आठवड्यातच आरे डेअरी येथील घराबाहेर बसलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला जखमी केले होते. त्याआधी बिबट्याच्या हल्ल्यात एक चार वर्षीय बाळदेखील जखमी झाले होते. त्यानंतर वन विभागाने पिंजरा लावून एका बिबट्याला बंदिस्त केले होते; मात्र हल्ला करणारा बिबट्या तोच आहे का, हे अद्याप वन विभागाने स्पष्ट केलेले नाही.

Mumbai
मुंबई : आरेतील बिबट्या अखेर जेरबंद

जंगल उजाड झाल्याने हल्ल्यांत वाढ
आरे परिसरात आगीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेकडो एकरांचा भूभाग उजाड झाला असून जंगलावर याचा परिणाम होत आहे. अतिक्रमणदेखील वाढत आहे. त्यामुळेच बिबट्याचे हल्ले वाढत असून यावर प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे आरे बचाव कार्यकर्ते संजीव वाल्सन यांनी सांगितले. दरम्यान, आरे परिसरात सर्वाधिक आगी युनिट क्रमांक १३ आणि १६ मध्ये लागल्या आहेत. बिबट्याचे सर्वाधिक हल्ले युनिट क्रमांक १६ मध्ये झाले आहेत.

Mumbai
सातारा : कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या शिरला गावात

हल्ले करणारी मादी
मादी बिबट्याकडून हल्ले होत असल्याचे उद्यानातील काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आरे जंगलात दोन मादी बिबट्या बहिणी असून त्यापैकी एका मादीला वन विभागाने पिंजऱ्यात बंद केले आहे. त्यामुळे दुसऱ्या मादीकडून हल्ले होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com