मुंबई : हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

आज सकाळी साडेआठच्या सुमारास पनवेलजवळ सीएसटीच्या दिशेने ओव्हरहेड वायरमधे तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी सीएसटीला जाणाऱ्या लोकल फेऱ्यांचा पुरता बोज्वारा उडाला.

मुंबई - अनेक तांत्रिक बिघडाचा सामना हार्बर मार्गावर सध्या करावा लागत आहे. अशाच बिघाडाचा सामना आज (गुरुवार) पुन्हा एकदा हार्बर मार्गावरील प्रवाशांना करावा लागला. ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेआठच्या सुमारास पनवेलजवळ सीएसटीच्या दिशेने ओव्हरहेड वायरमधे तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी सीएसटीला जाणाऱ्या लोकल फेऱ्यांचा पुरता बोज्वारा उडाला. पनवेल ते सीएसटी लोकल या बेलापूरपर्यंतच चालवण्यात येत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

बिघाड दुरुस्तीचे काम अद्यापही सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना पर्यायी वाहतुकीचा मार्ग अवलंबवावा लागत आहे. 

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या ः
पुणे अन् कोल्हापुरमधील अपघातग्रस्त बसचा क्रमांक एकच​
सहारनपूरमध्ये मोबाईल इंटरनेटवर बंदी​
काश्मीरमध्ये निर्णय घेण्यासाठी लष्कराचे हात मोकळे: जेटली
शेतकऱ्यांना फसवणाऱ्या टोळक्यात मीही सामील झालो: राजू शेट्टी

राज्यातील पाच स्थळांना मिळणार जैवविविधता वारसाचा दर्जा
मराठा क्रांती मोर्चा 9 ऑगस्टला मुंबईत धडकणार

Web Title: Mumbai: Local traffic disrupted on Harbour line