esakal | मोठी बातमी - देवनार पशुवधगृहात आजपासून धार्मिक कत्तलीला परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी - देवनार पशुवधगृहात आजपासून धार्मिक कत्तलीला परवानगी

देवनार पशुवधगृहात 1 ते 3 ऑगस्ट दरम्यान धार्मिक कत्तलीला महापालिकेने परवानगी दिली आहे.

मोठी बातमी - देवनार पशुवधगृहात आजपासून धार्मिक कत्तलीला परवानगी

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई :  देवनार पशुवधगृहात 1 ते 3 ऑगस्ट दरम्यान धार्मिक कत्तलीला महापालिकेने परवानगी दिली आहे. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 याकाळात कत्तलखाना सुरु राहाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. यानुसार प्रत्येक दिवशी 150 म्हैस वर्गिय प्राण्याची कत्तल करण्यात येणार आहे. मात्र, परवानधारक व्यापाऱ्याला आयात परवाना घेऊनच ही कत्तल करुन घेता येणार आहे.

कोविडच्या साथीमुळे निम्म्या क्षमतेने कत्तलखाना चालवला जात आहे. त्यात 1 ते 3 ऑगस्टपर्यंत धार्मिक कत्तलीची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी कोविड प्रतिबंधासाठी लागू असलेले नियम पाळावे लागणार आहेत. यात गर्दी न करणे, सामाजिक अंतर राखणे मास्क वापरणे बंधनकारक आहे.

महत्त्वाच्या बातम्या वाचा : 

-- दहावी-बारावीच्या परीक्षा सुरूच राहणार; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तरतूद 

-- 5 हजार खाटांच्या महारुग्णालयाची तयारी सुरू; पालिकेने जमिनीसाठी मागितले अर्ज

-- जे.जे. रुग्णालयाचे अनोखे संशोधन; विनासंसर्ग होईल रुग्णांची ने-आण...

-- धारावी तर आटोक्यात आलं; पण 'या' वस्त्यांनी वाढवली मुंबई महापालिकेची चिंता...

-- कोरोना योद्ध्यांच्या वारसांसाठी काय केले? उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा...

mumbai municipal corporation gives permission to open deonar slaughter house

loading image